'जो अपराध करेगा वो बचेगा नही'; कमल हासनच्या 'इंडियन २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:36 IST2024-06-26T09:35:17+5:302024-06-26T09:36:47+5:30
कमल हासन यांच्या आगामी 'इंडियन २' चा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय (indian 2, kamal haasan)

'जो अपराध करेगा वो बचेगा नही'; कमल हासनच्या 'इंडियन २' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
गेल्या काही दिवसांपासून साऊथ सिनेमांची चांगली चलती आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रत्येक सिनेमा लोकांच्या मनावर राज्य करतोय. मग तो 'मंजूमल बॉईज' असो, 'द गोट लाईफ' असो वा नुकताच रिलीज झालेला 'महाराजा'. वेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्यात यशस्वी ठरले आहेत. अशाच एका बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. त्याचं नाव 'इंडियन २'. कसा आहे सिनेमाचा ट्रेलर?
'इंडियन २' चा ट्रेलर रिलीज
मागील काही दिवसांपासून 'इंडियन २' च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला होती. काल 'इंडियन २'चा मुंबईत ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या सोहळ्यात स्वतः कमल हासन उपस्थित होते. 'इंडियन २'च्या ट्रेलरमध्ये भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी वीरसेकरन पुन्हा एकदा सज्ज झालाय. जागोजागी भ्रष्टाचार फोफावत चाललाय. तरुण पिढी फक्त सोशल मीडियावर पोस्ट करुन दुःख व्यक्त करतेय.
प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवायला कोणी पुढे येत नाही. अशावेळी पुन्हा एकदा वीरसेकरन भ्रष्टाचार करुन देश पोखरणाऱ्या व्यावसायिकांना आणि राजकारण्यांना धडा शिकवायला पुढे येतो. वीरसेकरनच्या भूमिकेत कमल हासन पुन्हा एकदा विविध बहुरंगी अवतारात पाहायला मिळतात. कमल हासन यांना बहुरुपी भूमिकेत पाहणं ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे.
'इंडियन २' कधी होणार रिलीज
आपल्या भव्यदिव्य सिनेमांसाठी ओळखले जाणाऱ्या शंकर यांनी 'इंडियन २'चं दिग्दर्शन केलंय. कमल हासन यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूड आणि साऊथमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय काजल अग्रवाल सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. भव्यदिव्य असलेल्या 'इंडियन २'च्या ट्रेलरने अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. १२ जुलैला सिनेमा थिएटरमध्ये बघायला मिळेल.