कमल हासन यांच्या वाढदिवशी Thug Life सिनेमाचा टीझर रिलीज! 'या' दिवशी होणार जगभरात प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 17:49 IST2024-11-07T17:48:06+5:302024-11-07T17:49:01+5:30
कमल हासन यांच्या वाढदिवशी त्यांच्या आगामी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे (kamal haasan, thug life)

कमल हासन यांच्या वाढदिवशी Thug Life सिनेमाचा टीझर रिलीज! 'या' दिवशी होणार जगभरात प्रदर्शित
आज भारतीय सिनेसृष्टीतले 'नायक' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते कमल हासन यांचा वाढदिवस. कमल हासन यांच्या वाढदिवसाला त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट मिळालीय. ती म्हणजे कमल हासन यांच्या आगामी सिनेमाचा अर्थात 'ठग लाईफ'चा टीझर रिलीज झालाय. 'ठग लाईफ'मध्ये कमल हासन वयाच्या सत्तरीत दे मार अॅक्शन करताना दिसणार आहेत. अवघ्या ४४ सेंकदांचा असलेला हा टीझर अल्पावधीत व्हायरल झालाय.
'ठग लाईफ'च्या टीझरमध्ये काय?
'ठग लाईफ'च्या अवघ्या ४४ सेकंदाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 'ठग लाईफ'च्या टीझरमध्ये दाढी आणि केस वाढवलेले कमल हासन दिसतात. वेगळ्याच अवतारात ते गुंडांना लोळवताना दिसतात. त्यांचे शत्रू त्यांच्या मागावर असतात. शेवटी दिसतं की कमल हासन क्लीन शेव्ह लूक अन् डोळ्यावर गॉगल अशा रुबाबदार अवतारात आपल्यासमोर येतात. अशाप्रकारे 'ठग लाईफ'च्या छोट्याश्या ट्रेलरमध्ये कमल हासन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात स्वतःची छाप पाडलीय.
The SOUND. The QUALITY. The GRANDNESS.
— Nivas Rahmaniac (@NivasPokkiri) November 7, 2024
An AR Rahman Masterpiece 🔥#ThugLifepic.twitter.com/OrqMNRQZZV
'ठग लाईफ' या दिवशी होणार रिलीज
कमल हासन यांच्या वाढदिवशी 'ठग लाईफ'चा टीझर रिलीज झालाच शिवाय प्रेक्षकांना सिनेमाच्या रिलीजची तारीखही कळली. 'ठग लाईफ' सिनेमा पुढील वर्षी अर्थात ५ जानेवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कमल हासन यांच्यासोबत सिलम्बरासन टीआर, तृषा, अभिरामी आणि नसीर हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सर्वांना कमल हासन यांच्या 'ठग लाईफ'ची कमालीची उत्सुकता आहे.