'कांतारा चाप्टर १' सिनेमाबद्दल मोठी अपडेट, मेकर्सने नवीन व्हिडीओ शेअर करुन जाहीर केली रिलीज डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:56 IST2025-04-03T12:56:16+5:302025-04-03T12:56:54+5:30
'कांतारा चाप्टर १' सिनेमाबद्दल मेकर्सने मोठी अपडेट शेअर केली असून व्हिडीओ रिलीज केलाय

'कांतारा चाप्टर १' सिनेमाबद्दल मोठी अपडेट, मेकर्सने नवीन व्हिडीओ शेअर करुन जाहीर केली रिलीज डेट
२०२२ साली रिलीज झालेल्या 'कांतारा' सिनेमा चांगलाच गाजला. अनपेक्षितरित्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलंच शिवाय प्रेक्षकांचं प्रेमही मिळवलं. आता 'कांतारा' सिनेमाचा प्रीक्वल अर्थात 'कांतारा चाप्टर १'विषयी मेकर्सने नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. फक्त व्हिडीओ पोस्ट केला नाही तर 'कांतारा चाप्टर १'च्या रिलीजची तारीखही सांगितली आहे. जाणून घ्या 'कांतारा चाप्टर १' ची रिलीज डेट काय आहे
'कांतारा चाप्टर १'ची रिलीज डेट
कन्नड ब्लॉकबस्टर असलेला 'कांतारा' सिनेमाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं होतं. 'कांतारा चाप्टर १'मध्ये ऋषभ पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काहीच तासांपूर्वी 'कांतारा चाप्टर १'च्या रिलीजविषयी मेकर्सने एक व्हिडीओ शेअर केलाय. गेल्या काही दिवसांपासून 'कांतारा चाप्टर १'ची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार अशी चर्चा सुरु होती. पण या सर्व चर्चा अफवा असल्याचं मेकर्सने सांगितलं आहे. याशिवाय 'कांतारा चाप्टर १' २ ऑक्टोबर २०२५ लाच रिलीज होणार, यावर मेकर्सने पुष्टी दिली आहे.
'कांतारा चाप्टर १'साठी जय्यत तयारी
'कांतारा चाप्टर १' सिनेमा पाहणं हा एक अद्भत प्रकारचा अनुभव असणार यात शंका नाही. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळावर आधारलेला आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते. त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे. त्यामुळे जेव्हा 'कांतारा चाप्टर १' रिलीज होईल, तेव्हा या सिनेमाचा अनुभव घेणं सर्वांसाठी एक विलक्षण गोष्ट असेल.