पायरसीविरोधात 'कांतारा' फेम अभिनेता रिषभ शेट्टीनं उठवला आवाज, म्हणाला - "वर्षाला होतं इतक्या कोटींचं नुकसान"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 05:27 PM2023-11-04T17:27:15+5:302023-11-04T17:27:35+5:30
Rishabh Shetty : कांतारा स्टार ऋषभ शेट्टी सतत चर्चेत असतो. अभिनेत्याने अलीकडेच पायरसीविरोधात आवाज उठवला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट 'कांतारा'(Kantara Movie)ने जगभरात खळबळ उडवून दिली होती. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याच्या कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. अभिनयासोबतच ऋषभ शेट्टी(Rishabh Shetty)ने याचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऋषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. आता कांतारा स्टारने पायरसीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सरकारकडून एक प्रसिद्धीपत्रक शेअर केले आहे. हे शेअर करताना त्याने लिहिले आहे की, 'आम्हाला पायरसीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. पायरसीमुळे आपल्या फिल्म इंडस्ट्रीला दरवर्षी २०००० कोटी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे.
Major action to curb film piracy as industry faces losses of Rs. 20,000 crore annually due to piracy
— Rishab Shetty (@shetty_rishab) November 3, 2023
CBFC and @MIB_India officers authorised to direct blocking/take down of any website/App/link carrying pirated filmic content https://t.co/TcYkXrjMYG
चाहत्यांना आवाहन
यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांना आवाहनही केले आहे की त्यांनी पायरेटेड चित्रपट दाखवणाऱ्या सर्व वेबसाईट ब्लॉक कराव्यात. त्याचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. या निर्णयावर चाहते त्याला पूर्ण पाठिंबा देत आहेत.
प्रीक्वलची होतेय चर्चा
'कांतारा' सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याच्या प्रीक्वलबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. त्याचे बजेट १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, जे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 'कांतारा' फक्त १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर एकूण ४०० कोटींहून अधिक कमाई केली होती.