KGF फेम यशचा नवा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला; ८ डिसेंबरला करणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 17:20 IST2023-12-04T17:19:53+5:302023-12-04T17:20:12+5:30
'केजीएफ १' (KGF 1) आणि 'केजीएफ २'(KGF 2 )च्या अपार यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) सध्या काय करतोय, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. 'केजीएफ ३'ची प्रतीक्षा करणाऱ्या आपल्या चाहत्यांना यश लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे.

KGF फेम यशचा नवा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला; ८ डिसेंबरला करणार घोषणा
'केजीएफ १' (KGF 1) आणि 'केजीएफ २'(KGF 2 )च्या अपार यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) सध्या काय करतोय, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. 'केजीएफ ३'ची प्रतीक्षा करणाऱ्या आपल्या चाहत्यांना यश लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे. ८ डिसेंबरला यश आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे समजते आहे. यश कोणत्या चित्रपटात दिसणार या प्रश्नाचं उत्तर या दिवशी मिळणार आहे.
सुरुवातीला सांगितलं जात होतं की यश केजीएफ ३ मध्ये दिसणार आहे आणि तो या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. मात्र याबद्दल यश कडून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तसेच याबाबत प्रशांत नीलनेही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. प्रशांत नीलने नुकतेच सालारचा ट्रेलर रिलीज केला. हा चित्रपट २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. असे सांगितले जात होते की, तो केजीएफ फ्रेंचाइजीचा हिस्सा आहे, मात्र हे वृत्त प्रशांत नीलने फेटाळून लावले आहे.
यशच्या नवीन चित्रपट 'यश 19'ची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शनद्वारे केली आहे. यशने स्वतः त्याच्या चित्रपटाचे अपडेट चाहत्यांशी शेअर केले आणि सांगितले की चित्रपटाचे शीर्षक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९:५५ वाजता समोर येईल. त्यानंतरच कळेल की यशचा कोणता चित्रपट आहे ज्यासाठी गेल्या दीड वर्षापासून तयारी करत होता. यशने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन प्रोजेक्टचा फोटो शेअर करत लिहिले, 'वेळ आली आहे. ८ डिसेंबर रोजी रात्री ९:५५ वा. केव्हीएन प्रॉडक्शनशी संपर्कात रहा.'
यशच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटींच्या कमेंट्सदेखील येत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, आता हा आणखी एक कोट्यावधींचा चित्रपट येत आहे. तसेच चाहत्यांचे असेही म्हणणे आहे की, या डिसेंबरमध्ये सुनामी नक्की आहे. एका चाहत्याने लिहिले की, संपूर्ण भारत वाट पाहत आहे. सलाम रॉकी भाई. रिपोर्ट्सनुसार, यशचा हा नवीन चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका गीतू मोहनदास दिग्दर्शन करणार आहे. असे सांगितले जात आहे की, हा एक मास अॅक्शन सिनेमा असणार आहे, ज्याची कथा ड्रग्स माफियावर आधारीत असेल.