KGF स्टार यशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:51 IST2025-01-06T13:50:52+5:302025-01-06T13:51:15+5:30

साउथ सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' सिनेमाची पहिलं पोस्टर भेटीला आलं असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (toxic, yash)

KGF star Yash's upcoming toxic movie poster unveiled toxic teaser will released soon | KGF स्टार यशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक

KGF स्टार यशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक

KGF आणि KGF 2 सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता यशच्या आगामी 'टॉक्सिक' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. KGF नंतर यश पुन्हा एकदा दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. 'टॉक्सिक'चं मोशन पोस्टर गेल्यावर्षी प्रदर्शित झालं. तेव्हापासून 'टॉक्सिक'बद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी यश आणि त्याचे चाहते उत्सुक आहेत. अशातच यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आगामी 'टॉक्सिक' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून सिनेमाची पहिली झलक कधी येणार हे सुद्धा सांगण्यात आलंय.

'टॉक्सिक'चं पहिलं पोस्टर

'टॉक्सिक'चं प्रॉडक्शन हाउस KVN यांनी नुकतंच सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं. गंमतीशीर गोष्ट अशी घडली की,  KVN  प्रॉडक्शन हाउसने सिनेमाचं पोस्टर शेअर करुन काही वेळात ते डिलीट केलं. परंतु चाहत्यांनी लगेचच स्क्रीनशॉट घेऊन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलं. या पोस्टरमध्ये विंटेज कार दिसत असून त्यामागे पाठमोरा यश उभा असलेला दिसत आहे. डोक्यावर टोपी आणि स्टाइलमध्ये सिगारेट ओढत असलेल्या यशचा अनोखा स्वॅग दिसत आहे.

या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक

'टॉक्सिक'च्या पोस्टरवर दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये अर्थात ८ जानेवारी २०२५ ला या सिनेमाची पहिली झलक रिलीज करणार आहे. त्यामुळे KGF नंतर यशचा हा नवीन सिनेमा पाहायला त्याचे चाहते आतुर आहेत. 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूर झळकणार असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा याचवर्षी २०२५ ला रिलीज होणार आहे. यश सध्या 'रामायण' सिनेमात रावणाची भूमिका साकरण्यासाठी तयारी करतोय. 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग २०२६ ला रिलीज होणार आहे. 

 

Web Title: KGF star Yash's upcoming toxic movie poster unveiled toxic teaser will released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.