रॉयल क्लब, डोक्यावर हॅट अन् बोल्ड अंदाज; KGF स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाची पहिली झलक बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:48 IST2025-01-08T12:47:40+5:302025-01-08T12:48:04+5:30

'टॉक्सिक' सिनेमाची सध्या चर्चा असून यशच्या आगामी सिनेमाचा पहिला लूक व्हिडीओ रिलीज झालाय (toxic)

kgf superstar Yash upcoming movie Toxic teaser release first look | रॉयल क्लब, डोक्यावर हॅट अन् बोल्ड अंदाज; KGF स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाची पहिली झलक बघाच

रॉयल क्लब, डोक्यावर हॅट अन् बोल्ड अंदाज; KGF स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाची पहिली झलक बघाच

KGF या सिनेमाने लोकप्रिय झालेला अभिनेता यश. आज सुपरस्टार यशचा वाढदिवस आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी सिनेमा 'टॉक्सिक'च्या मेकर्सने खास घोषणा केलीय. 'टॉक्सिक' सिनेमाचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. त्यानंतर आज यशच्या वाढदिवसानिमित्त सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करण्यात आलीय. यामध्ये यशच्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलंय

'टॉक्सिक'चा पहिला व्हिडीओ

यशच्या वाढदिवसानिमित्त बर्थडे पीक अशी टॅगलाइन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत दिसतं की, यश एका आलिशान विंटेज कारमधून बाहेर येतो. या कारमधून बाहेर आल्यावर तो मोठी सिगार पेटवतो आणि क्लबमध्ये एन्ट्री घेतो. त्या क्लबमध्ये परदेशी मॉडेल मोहक अंदाजात नृत्य करताना दिसतात. यश एन्ट्री घेताच सर्वजण त्याचा स्वॅग पाहून त्याच्याकडे आकर्षित होतात. नंतर यश एका मॉडेलसोबत रोमान्स करताना दिसतो.


कधी रिलीज होणार  'टॉक्सिक'

यशच्या आगामी 'टॉक्सिक' सिनेमाचा फर्स्ट लूक व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिलीय. या सिनेमातील यशचा स्वॅग आणि त्याचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. यश या सिनेमात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यशसोबत या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार याचाही उलगडा व्हायचाय. हा सिनेमा याचवर्षी २०२५ ला रिलीज होणार आहे. रिलीज डेटची अजून घोषणा झाली नाहीये. 

Web Title: kgf superstar Yash upcoming movie Toxic teaser release first look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.