समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:05 AM2023-09-04T10:05:34+5:302023-09-04T12:46:29+5:30

'खुशी' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींहून अधिक कमाई केली होती.

kushi box office collection day 3 samantha ruth prabhu vijay deverakonda film earns 11 crore net in india on sunday | समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

googlenewsNext

 Kushi Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभुचा यावर्षी २०२३मध्ये बहुप्रतिक्षित 'खुशी' सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. समांथा आणि विजयची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे परिणामी या सिनेमान पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५  कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता यासिनेमाच्या तिसऱ्या दिवशीचा कमाईचा आकडा ही समोर आला आहे. 

'खुशी' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना आवडली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार  विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू स्टारर कुशीने १६ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईचे आकडे पडले. आता रविवारचे कलेक्शनही समोर आले आहे.

 ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार तिसऱ्या दिवशी रविवारी या सिनेमाने ११ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासह सिनेमाची आतापर्यंतची ऐकूण कमाई ३६. १५ कोटींवर गेली आहे.   

उल्लेखनीय आहे की विजय देवरकोंडा ५ वर्षांनंतर कुशीचे यश साजरे करत आहे कारण २०१९ नंतरचा हा त्याचा पहिला हिट चित्रपट आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने चाहत्यांकडून मिळालेले मेसेज आणि त्यांच्या समर्थनाचे आभार मानले आहेत. 

४० ते ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या विजय देवरकोंडाच्या खुशीआधी अनन्या पांडेसोबतचा त्याचा लिगर चित्रपट आला होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. समांथाचे ही सिनेमे गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर फारसे काही चालत नव्हते. त्यामुळे समांथा आणि विजय यांच्या फ्लॉप सिनेमांच्या सिरिजला कुशी ब्रेक लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Web Title: kushi box office collection day 3 samantha ruth prabhu vijay deverakonda film earns 11 crore net in india on sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.