प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 19:47 IST2023-12-08T19:45:33+5:302023-12-08T19:47:53+5:30
चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ
दाक्षिणात्य चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ती 24 वर्षांची होती. संयुक्त अरब अमिरातील शारजाह येथे तिचे निधन झाले आहे. तिच्या निधनाच्या बातमीने मल्याळम इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांपासून ते मल्याळम इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण श्रद्धांजली वाहत आहेत.
दुबईतील शारजाहमध्ये ती बँकेतील कामासाठी गेली होती, असे सांगण्यात येत आहे. लक्ष्मीका सजीवनची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 2 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये तिने सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अंधार असूनही आशा आहे...प्रकाश आहे'.
लक्ष्मीकाने आपल्या उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. मेहनतीच्या बळावर तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये तिने काम केले होते. 'पुढायम्मा', 'पंचवर्णथा', 'सौदी वेलाक्का', 'उयारे', 'ओरू कुटनादन ब्लॉग', 'ओरू यमंदन प्रेमकथा' आणि 'नित्यहरिथा नायगन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मल्याळम शॉर्ट फिल्म 'कक्का' मधून तिला खरी लोकप्रियता मिळाली होती. ज्यामध्ये तिने पंचमीची मुख्य भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली. या चित्रपटातील तिच्या कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.