सुप्रसिद्ध अभिनेत्याला अटक! पूर्वपत्नी आणि मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषणाचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:24 IST2024-10-14T16:23:26+5:302024-10-14T16:24:56+5:30
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्यावर मुलगी आणि पूर्वपत्नीने गंभीर आरोप केल्याने अभिनेत्याला बेड्या ठोकल्या आहेत

सुप्रसिद्ध अभिनेत्याला अटक! पूर्वपत्नी आणि मुलीचे शारीरिक आणि मानसिक शोषणाचे गंभीर आरोप
सध्या मल्याळम इंडस्ट्री चांगलीच चर्चेत आहे. हेमा कमिटीचा रिपोर्ट आल्यापासून अनेक अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. अशातच मल्याळम इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय बालाचा मॅनेजर राजेश आणि अनंत कृष्णन यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बालाची पूर्वपत्नी आणि मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर शारीरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप केल्याने अभिनेत्याला पोलिसांनी अटक केलीय.
बालावर पत्नी आणि मुलीने केले गंभीर आरोप
मीडिया रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी बालाची पूर्वपत्नी अमृता सुरेशने अभिनेत्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. बालाने केलेल्या मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला, असा आरोप अमृताने बालावर केला. सततच्या मारहाणीमुळे अमृताच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला. बालाच्या आधीच्या ड्रायव्हरनेही या गोष्टीला दुजोरा दिला असून बाला पूर्वपत्नीसोबत गैरव्यवहार करत असल्याचं सांगितलं.
🎥| Malayalam actor #Bala arrested over ex-wife's #AmruthaSuresh social media insult complaint. #Malayalam#MalayalamIndustry#LatestUpdates#TheStatesmanpic.twitter.com/OolE085QSC
— The Statesman (@TheStatesmanLtd) October 14, 2024
मुलीनेही केले आरोप
अभिनेता बालाच्या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप केले. मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेता बालाने मात्र पूर्वपत्नी आणि मुलीच्या आरोपांंचं खंडन केलं. अशाप्रकारे पत्नी - मुलीने केलेल्या आरोपांमुळे पोलिसांनी अभिनेता बालाला बेड्या ठोकल्या. आता बालाला काय शिक्षा होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.