'मंज्युमल बॉईज' अभिनेत्याला हिट अँड रन प्रकरणी अटक, बाईकस्वाराला दिली जोरात धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:47 PM2024-10-16T12:47:54+5:302024-10-16T12:48:31+5:30

सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याला पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय (manjummel boys)

manjummel boys fame Actor Sreenath Bhasi was arrested and released on station bail in connection with a road accident | 'मंज्युमल बॉईज' अभिनेत्याला हिट अँड रन प्रकरणी अटक, बाईकस्वाराला दिली जोरात धडक

'मंज्युमल बॉईज' अभिनेत्याला हिट अँड रन प्रकरणी अटक, बाईकस्वाराला दिली जोरात धडक

२०२४ मध्ये एका मल्याळम सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. तो सिनेमा म्हणजे 'मंज्युमल बॉईज'. जिगरबाज मित्रांच्या खऱ्या कहाणीवर आधारीत 'मंज्युमल बॉईज' सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील एका कलाकाराला हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. श्रीनाथ भासी असं या कलाकाराचं नाव असून अभिनेत्याच्या कारची बाईकला धडक बसल्याने त्याला अटक करण्यात आली.

श्रीनाथ भासीला अटक नंतर जामिनावर सुटका

'मंज्युमल बॉईज' फेम अभिनेता श्रीनाथ भासीला हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु मंगळवारी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. श्रीनाथला अटक झाल्यानंतर त्याचं ड्रग्जशी काही कनेक्शन आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. श्रीनाथची कार एका बाईकला धडकल्याने बाईकस्वार जखमी झाला. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी याप्रकरणी गेल्या महिन्यात तक्रार नोंदवल्याने श्रीनाथला अटक करण्यात आली होती. 

ड्रग पार्टीशी कनेक्शन

या दुर्घटनेत बाईकस्वार असलेल्या पीडित व्यक्तीला गंभीर जखम झाली. श्रीनाथच्या अटकेनंतर त्याचं ड्रग पार्टीशी कनेक्शन आहे का, याचा पोलीसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान श्रीनाथ भासीने सुप्रसिद्ध मल्याळम सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. 'मंज्युमल बॉईज', 'पारवा',  'कुंबलंगी नाईट्स' अशा विविध सिनेमांमध्ये श्रीनाथ भासीने साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. 

Web Title: manjummel boys fame Actor Sreenath Bhasi was arrested and released on station bail in connection with a road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood