लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 11:38 AM2024-12-12T11:38:49+5:302024-12-12T11:39:12+5:30
लग्नानंतर शोभिता आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसले. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
साऊथ इंडस्ट्रीमधील नवं जोडपं नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकले. नागा चैतन्य आणि शोभिताने ४ डिसेंबरला पारंपरिक पद्धतीने विवाह केला. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर शोभिता आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसले. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नागा चैतन्यदेखील पत्नी शोभितासह आलियाच्या लग्नाला पोहोचला होता. यावेळी त्यांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. नागा चैतन्यने काळ्या रंगाचा सूट घातला होता. तर नववधू शोभिता डिझायनर ड्रेस घालून या विवाहसोहळ्याला आली होती. यावर तिने भली मोठी ओढणीही घेतली होती. पण, नववधू शोभिताचा हा लूक चाहत्यांना मात्र आवडला नाही. तिच्या या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
आलिया कश्यपच्या रिसेप्शन सोहळ्यातील शोभिता आणि नागा चैतन्यचा व्हिडिओ विरल भय्यानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शोभिता आणि नागा चैतन्य पापाराझींना पोझ देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शोभिताला ट्रोल केलं आहे. "ड्रेस सेन्सच नाहीये", "हिची फॅशनच कळली नाही", "शोभिताला शून्य ड्रेसिंग सेन्स आहे", "तो नेहमी चांगलं ड्रेसिंग करतो. तिला हे शिकलं पाहिजे. हा ड्रेस चांगला नाही", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. २०१७ मध्ये त्याने समांथासोबत संसार थाटला होता. पण, ४ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. ऑगस्ट महिन्यात त्यांनी साखरपुडा करत त्यांचं नातं जाहीर केलं होतं.