लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का? नागा चैतन्यने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "प्रत्येक तेलुगु घराण्याप्रमाणे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:38 PM2024-12-03T12:38:08+5:302024-12-03T12:38:29+5:30
एका चाहत्याने नागा चैतन्यला लग्नानंतर शोभिताच्या करिअरबाबत प्रश्न विचारला. "लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का?" असा प्रश्न चाहत्याने विचारला.
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नागा चैतन्य आणि शोभिताच्या घरी लगीनघाई सुरू असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अशातच नागा चैतन्यनने शोभिताबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नागा चैतन्यने झूमवरुन त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरे दिली.
एका चाहत्याने नागा चैतन्यला लग्नानंतर शोभिताच्या करिअरबाबत प्रश्न विचारला. "लग्नानंतर शोभिता सिनेमात काम करणार का?" असा प्रश्न चाहत्याने विचारला. त्यावर उत्तर देताना नागा चैतन्य म्हणाला, "हो, नक्कीच". लग्नानंतरही शोभिता मोठ्या पडद्यावर दिसणार हे ऐकून चाहतेही आनंदी आहेत. या झूम कॉलमध्ये नागा चैतन्यने शोभिताच्या कुटुंबीयांबाबतही भाष्य केलं.
"प्रत्येक तेलुगु कुटुंबाप्रमाणे शोभिताची फॅमिलीदेखील सुसंस्कृत आणि प्रेमळ आहे. मला घरातील मुलासारखीच वागणूक मिळते. आमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य असल्यामुळे मला कम्फर्ट जाणवतो. शोभिता एक कौटुंबिक मुलगी आहे आणि आम्ही अनेक सण एकत्र साजरे केले आहेत. आमच्यातील नात हे काळानुरुप अधिक दृढ होत जाईल, असा मला विश्वास आहे", असं नागा चैतन्य म्हणाला.
नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने २०१७ मध्ये अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. पण, अवघ्या ४ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य आता शोभिता धुलिपालासोबत संसार थाटणार आहे. ४ डिसेंबरला ते पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत.