Video: नागा चैतन्यने बायकोला प्रेमाने मारली हाक, लाल साडीत बसलेली शोभिता खुदकन लाजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:44 IST2025-02-12T12:43:53+5:302025-02-12T12:44:29+5:30
नागाने स्टेजवरुन शोभिताला तो घरी प्रेमाने बोलवत असलेल्या नावाने हाक मारली.

Video: नागा चैतन्यने बायकोला प्रेमाने मारली हाक, लाल साडीत बसलेली शोभिता खुदकन लाजली
तेलुगु अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) सध्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी (Sobhita Dhulipala) लग्न केलं. लग्नानंतर नागाचा 'थंडेल' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये साई पल्लवी मुख्य अभिनेत्री आहे. नागा आणि साईची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. सिनेमाची नुकतीच सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला नागाची पत्नी शोभिताही आली होती. यावेळी नागाने स्टेजवरुन शोभिताला तो घरी प्रेमाने बोलवत असलेल्या नावाने हाक मारली. आता शोभिताची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.
समंथा रुथ प्रभूशी घटस्फोट झाल्यानंतर तीन वर्षातच अभिनेता नागा चैतन्यने दुसरं लग्न केलं. अभिनेत्री शोभिता धुलिपालाला तो डेट करत होता. ४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. 'थंडेल'च्या सक्सेस पार्टीत नागा चैतन्यला शोभितासाठी काहीतरी बोलायला सांगितलं. यावेळी बाजूलाच बसलेल्या शोभिताला नागा म्हणाला, "बुज्जी थल्ली, थोडा मुस्कुरा दो'. तो असं म्हणताच लाल साडीत बसलेली शोभिता लाजली. कारण नागा तिला घरात प्रेमाने ज्या नावाने तिला हाक मारतो त्याच नावाने तो इथे बोलतो.
'थंडेल'च्या प्रमोशनवेळीच नागा चैतन्यने खुलासा केला होता की तो शोभिताला घरी 'बुज्जी थल्ली' नावाने बोलवतो. याच नावाने सिनेमात एक गाणंही आहे. तो म्हणाला होता की," हे गाणं शोभितासाठीच आहे. सिनेमा बनवण्याआधीच मी चंदूला हे सांगितलं होतं. जेव्हा गाणं रिलीज झालं तेव्हा शोभिताला थोडं वाईट वाटलं होतं कारण आमच्यातील स्पेशल शब्द आता जगजाहीर झाला."
'थंडेल' सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. चंदू मोंडंती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. श्रीकाकुलम मधील मच्छिमार जे नकळतपणे पाकिस्तानच्या जलसीमेवर प्रवेश करतात यावर सिनेमा आधारित आहे.