"साखर खाण्यापेक्षा दारू प्या", नागा चैतन्यचा अजब सल्ला, हे काय बोलून गेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:30 IST2025-02-08T17:29:46+5:302025-02-08T17:30:10+5:30
एका मुलाखतीत अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. साखर खाण्याऐवजी दारू प्या किंवा तंबाखू खा असं नागा चैतन्य म्हणाला आहे.

"साखर खाण्यापेक्षा दारू प्या", नागा चैतन्यचा अजब सल्ला, हे काय बोलून गेला?
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य त्याच्या आगामी थंडेल सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागा चैतन्य अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. साखर खाण्याऐवजी दारू प्या किंवा तंबाखू खा असं नागा चैतन्य म्हणाला आहे.
नागा चैतन्यने रॉ टॉक्स विथ वीके पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्याने वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. तसंच हेल्थबद्दल बोलताना शरीरासाठी साखर खूप हानिकारक असल्याचं त्याने म्हटलं. तो म्हणाला, "साखर हे शरीरासाठी एक प्रकारचं विष आहे. याच्यापेक्षा दारू पिणे किंवा तंबाखू खाणे चांगलं आहे. आता यावर रील बनवू नका. पण, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की साखर आपल्यासाठी कॅन्सर, मधुमेहसारखे आजार उत्पन्न करते. म्हणून माझ्या आहारातही मी साखरेचा वापर करत नाही. फक्त चीट डेला मी साखर खातो".
या पॉडकास्टमध्ये नागा चैतन्यने समांथासोबतच्या घटस्फोटाबाबतही भाष्य केलं. "आमचे रस्ते वेगळे होते. काही कारणांमुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही एक दुसऱ्याचा आदर करतो. आम्ही जीवनात पुढे जात आहोत. यापेक्षा आणखी किती स्पष्टीकरण द्यायचं हे मला समजत नाही. मला आशा आहे की चाहते आणि मीडिया आमच्या या गोष्टीचा आदर करतील. कृपया करून आमचा आदर करा आणि आम्हाला प्रायव्हसी द्या. पण, दुर्देवाने हा चर्चेचा विषय बनला आहे. मी खूप सभ्यतेने जीवनात पुढे जात आहे आणि तीदेखील पुढे जात आहे. आम्ही आमचं आयुष्य आनंदाने जगत आहोत", असं त्याने म्हटलं आहे.