पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:33 AM2024-11-26T11:33:56+5:302024-11-26T11:34:57+5:30
नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) या दाक्षिणात्य कपलच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नागा चैतन्य हा साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. त्याने आधी समंथा रुथ प्रभूशी प्रेमविवाह केला होता. मात्र चारच वर्षात त्यांच्या घटस्फोट झाला. आता नागा शोभितासोबत दुसरं लग्न करणार आहे. पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे तब्बल ८ तास लग्नाचे विधी चालणार आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता ४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. हैदराबादमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार लग्नाचे विधी हे तब्बल ८ तास चालणार आहेत. त्या दिवशी पारंपरिक तेलुगु ब्राह्मण विवाह समारोहाचं आयोजन करण्यात येणार आहे. नवरा नवरी या समारोहाचा आदर राखत सर्व विधी पूर्ण करतील. दिवसभर पारंपरिक धार्मिक विधी पार पडतील. त्यांच्या निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, "दोन्ही कुटुंबात जोरदार तयारी सुरु आहे. शोभिता-नागा या महत्वाच्या दिवशी आठ तास सर्व विधी पूर्ण करतील. पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे आणि विशेषत: जुन्या परंपरा पाळल्या जाणार आहेत."
असा असेल शोभिताचा लूक
लग्नाच्या दिवशी शोभिता कांजीवरम साडी नेसणार आहे. या साडीवर खास सोन्याचं वर्क असणार आहे. शिवाय तिने एक पांढरी भरजरी साडीही निवडली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही साडी तयार करण्यात आली आहे. शोभिता स्वत: सगळी तयारी करत आहे. वारसाने चालत आलेल्या गोष्टींचीही ती काळजीपूर्वक माहिती घेत आहे. तसंच तिने नागासाठीही मॅचिंग सेट घेतला आहे.