"आमच्यात खूप खास बॉन्ड" नागा चैतन्य एक्स वाईफ समंथाबद्दल पहिल्यांदाच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:00 IST2023-12-01T15:59:20+5:302023-12-01T16:00:19+5:30
नुकतंच नागाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर दिलखुलासपणे बातचीत केली.

"आमच्यात खूप खास बॉन्ड" नागा चैतन्य एक्स वाईफ समंथाबद्दल पहिल्यांदाच बोलला
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. समंथासोबत (Samantha Prabhu) घटस्फोटानंतर दोघांनाही सतत याबद्दल विचारलं जातं. नुकतंच नागाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर दिलखुलासपणे बातचीत केली. यावेळी त्याने समंथासोबतच्या नात्यावरही खुलासा केला.
नागा चैतन्यने नुकतंच ओटीटीवर पदार्पण केलंय. आगामी सिनेमा 'धूता' साठी त्याने मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला,'जे लोक माझ्या जवळचे आहेत ते मला चांगलं ओळखतात. मला कोण काय बोलतं याचा फरक पडत नाही. यापेक्षा मला अभिनेता म्हणून माझं काम कसंय हे ऐकायला आवडेल ना की माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मी माझ्या कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. शेवटी जर माझे सिनेमे चांगले असतील आणि लोकांचं मनोरंजन होत असेल तर त्यांनी मला याच पद्धतीने लक्षात ठेवावं असं मला वाटतं.'
तो पुढे म्हणाला,'खूप विचार करुन मी आणि समंथाने तो निर्णय घेतला. आमचे मार्ग वेगळे झाले. आम्ही आता आमच्यानुसार आयुष्य जगत आहोत. पण आमच्यात एक खास बॉन्ड आहे. आयुष्यभर आम्ही आमची मैत्री निभावू.'
नागा चैतन्यचा 'धूता' आज अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे. यामध्ये त्याने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. यामध्ये प्राची देसाई, प्रिया भवानी शंकर आणि पार्वती थिरुवोथु कोट्टुवत्ताही मुख्य भूमिकेत आहेत.