कशी झाली नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची पहिली भेट, कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:36 PM2024-12-04T15:36:51+5:302024-12-04T15:38:26+5:30
Naga-Sobhita Wedding: शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य आज लग्नबेडीत अडकणार आहेत.
Naga-Sobhita Wedding: शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य आज लग्नबेडीत अडकणार आहेत. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये जवळच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत, सर्व विधी आणि समारंभांचे पालन करून ते दोघे सात फेरे घेतील. यासह हे जोडपे अधिकृतपणे पती-पत्नी बनतील. शोभिता आणि नागा चैतन्य गेल्या तीन वर्षांपासून डेट करत आहे. शोभिता आणि नागा यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते जाणून घेऊया.
नागा चैतन्यने ऑक्टोबर २०२१ मध्ये सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतला. काही महिन्यांनंतर, अभिनेत्याने शोभिताला त्याच्या हैदराबादच्या घरी पाहुणी म्हणून बोलवले होते. बऱ्याच रिपोर्टमधून असे दिसून आले की ही एक मैत्रीपूर्ण बैठक होती आणि दोघेही खूपच रिलॅक्स दिसत होते. यावेळी नागाने शोभिताला त्याच्या नवीन घराची माहितीही दिली. निघताना अनेकांनी त्यांना एकत्र पाहिले, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना उत्तेजन मिळाले.
२०२३ मध्ये लंडनच्या सुट्टीत त्यांच्या नात्यावर झाले शिक्कामोर्तब
२०२३ मध्ये मिशेलिन स्टार शेफ सुरेंद्र मोहन यांनी त्यांच्या लंडन रेस्टॉरंटमधून नागासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नेटकऱ्यांना शोभिता बॅकग्राउंडमध्ये एका टेबलावर बसलेली दिसली. हा फोटो हटवण्यात आला असला तरी, अनेक मीडिया रिपोर्ट्सने पुष्टी केली की लंडनमध्ये त्यांच्या सुट्टीच्या वेळी नागा आणि शोभिता यांना पहिल्यांदा कळले की ते प्रेमात आहेत.
२०२४ला केली जंगल सफारी
या वर्षाच्या सुरुवातीला, शोभिता धुलिपालाने तिच्या इंस्टाग्रामवर जंगल सफारीमधून एक फोटो शेअर केला होता आणि त्याच्या एका दिवसानंतर, चैतन्यने त्याच पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचा आनंद घेत असलेले एक फोटो शेअर केला होता. पुढच्या महिन्यात हे जोडपे युरोपला सुट्टीसाठी गेले.
९ ऑगस्ट रोजी केली एंगेजमेंट
९ ऑगस्ट रोजी नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी लिहिले की, आम्हाला आमचा मुलगा नागा चैतन्यची शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. जे आज सकाळी ९.४२ वाजता झाली. या जोडप्याच्या लग्नाआधीच्या फंक्शन्स डिसेंबरमध्ये सुरू झाल्या, ज्यामध्ये राता स्थान, मंगलस्नानम आणि पेल्ली कुथुरु या समारंभांचा समावेश होता.
४ डिसेंबरला होणार लग्न
नागा आणि शोभिता यांचे आज, बुधवार, ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाचे विधी ८ तास चालणार आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन, रामचरण यांच्यासह अनेक स्टार्स या जोडप्याच्या पारंपरिक लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे