तुफान व्हायरल होतोय नागार्जुनचा जुना Video, शोभिता धुलिपाला म्हटलं होतं "Hot"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:45 PM2024-08-08T16:45:57+5:302024-08-08T16:49:20+5:30

नागार्जुनच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nagarjuna Called Sobhita Dhulipala Hot video viral after Naga Chaitanya engagement | तुफान व्हायरल होतोय नागार्जुनचा जुना Video, शोभिता धुलिपाला म्हटलं होतं "Hot"

तुफान व्हायरल होतोय नागार्जुनचा जुना Video, शोभिता धुलिपाला म्हटलं होतं "Hot"

Nagarjuna Called Sobhita Dhulipala Hot : तेलुगू अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी ( Sobhita Dhulipala ) साखरपुडा केला आहे.  आज (८ ऑगस्ट रोजी) रोजी हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engaged) समारंभ पार पडला.  नागार्जुनने मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यातच आता नागार्जुनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपूडा पार पडल्यानंतर आता नागार्जुनच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन हा त्याची भावी सून शोभिता हिला 'हॉट' म्हणताना पाहायला मिळतोय.  नागार्जुनचा हा व्हिडीओ 2018 मधील एका कार्यक्रमातील आहे. जिथे नागार्जुनने सर्वांसमोर शोभिताच्या सौंदर्याचे कौतुक केलं होतं आणि तिला 'हॉट' म्हटलं होतं. 

Nagarjuna once said this about his future Daughter in Law, Sobhita
byu/Significant-Neat-142 inBollyBlindsNGossip

व्हिडीओमध्ये नागार्जुन म्हणतो, "शोभिता धुलिपाला ही खूपच चांगली आहे. म्हणजे, मी असं म्हणायला नको. पण, चित्रपटात ती खूपच हॉट आहे. तिच्यामध्ये असं काही आहे, जे आकर्षक आहे". नागार्जुनच्या या व्हिडीओवरन नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या रेडिटवर व्हायरल होत आहे.


दरम्यान,  नागा चैतन्य व शोभिता काही वर्षांपासून डेटिंग करत होते. आज दोघांनी साखरपुडा करून आपलं नातं अधिकृत केलं.  नागा चैतन्य व शोभिताला नवीन इनिंगसाठी सिनेसृष्टीतील कलाकार व चाहते शुभेच्छा देत आहेत. आज साखपूडा पार पडलेला असाल तरी ते दोघे लग्न कधी करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शोभिता ही ३२ वर्षांची असून नागा चैतन्य ३७ वर्षांचा आहे.  नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथसोबत लग्न केले होते, पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. 

Web Title: Nagarjuna Called Sobhita Dhulipala Hot video viral after Naga Chaitanya engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.