"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली...
By ऋचा वझे | Updated: March 5, 2025 12:09 IST2025-03-05T12:08:29+5:302025-03-05T12:09:21+5:30
नयनताराने सोशल मीडियावर एक सर्क्युलर जारी केलं. यामध्ये ती लिहिते...

"मला 'लेडी सुपरस्टार' म्हणू नका", अभिनेत्रीची चाहत्यांना नम्र विनंती; कारण सांगत म्हणाली...
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) जगभरात प्रसिद्ध आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिची नुकतीच नेटफ्लिक्सवर 'नयनतारा' ही डॉक्युमेंटरी आली ज्यामध्ये तिच्या आयुष्यातील सर्वच क्षण दाखवण्यात आले आहेत. नयनताराने २०२३ साली थेट शाहरुख खानसोबत 'जवान' सिनेमातून बॉलिवूडमधून पदार्पण केलं. म्हणूनच नयनताराचा चाहतावर्ग तिला 'लेडी सुपरस्टार' म्हणतो. पण आता नयनताराने चाहत्यांना या नावाने न संबोधण्याची विनंती केली आहे.
नयनताराने सोशल मीडियावर एक सर्क्युलर जारी केलं. यामध्ये ती लिहिते,"प्रिय चाहत्यांनो, पत्रकार मित्रांनो, एक अभिनेत्री म्हणून मला या प्रवासात जे यश मिळालं आणि आनंद मिळाला त्यासाठी मी मनापासून सर्वांची आभारी आहे. माझं आयुष्य तर खुलं पुस्तकच आहे ज्यामध्ये तुमचं नि:स्वार्थी प्रेम आणि जिव्हाळा आहे. यश मिळाल्यावर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देणं असो किंवा कठीण काळात मला पुन्हा वर येण्यासाठी हात देणं असो, तुम्ही प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होतात."
NAYANTHARA will always be and only NAYANTHARA🙏🏻 pic.twitter.com/fZDqhXM4Vl
— Nayanthara✨ (@NayantharaU) March 4, 2025
तुमच्यापैकी अनेक जण मला 'लेडी सुपरस्टार' असं संबोधतात. हे तुमच्या प्रेमातूनच आलेलं नाव आहे. तुम्ही इतकं किंमती टायटल मला दिलंत त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. तथापि माझी तुम्हाला प्रामाणिक विनंती आहे की तुम्ही मला 'नयनतारा'च म्हणा. कारण हे नाव माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अभिनेत्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा हे नाव माझं व्यक्तिमत्व दर्शवतं. नाव आणि प्रशंसा याची किंमत मोजता येत नाही पण काहीवेळेस हीच प्रतिमा बनून जाते जी कलाकारांना त्यांच्या कामापासून आणि तुम्हा दर्शकांपासून वेगळी करते."
मला विश्वास आहे तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत राहील. भविष्य कोणीही पाहिलेलं नाही पण तुमचा पाठिंबा माझ्यासोबत कायम असेल याचा मला आनंद आहे. तुमच्या मनोरंजनासाठी मी कायमच मेहनत घेत राहील. सिनेमा आपल्याला जोडतो त्यामुळे तो साजरा करत राहुया."