दिल्लीतील हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती अभिनेत्री, ओळखलं का? पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:59 PM2024-11-27T14:59:55+5:302024-11-27T15:00:35+5:30
लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सेलिब्रेटी कुठेही गेले की त्यांच्या पाठीमागे पापाराझी किंवा चाहत्यांची गर्दी असते. सर्व सामान्यप्रमाणे जगणं त्यांना क्वचितच मिळतं. अनेकदा सेलिब्रेटी चाहत्यांपासून लपून छपून फिरतात. अनेकदा ते चाहत्यांच्या नजरेतून सूटत नाहीत. अशातच एक लोकप्रिय अभिनेत्री आपल्या पतीसोबत दिल्लीतील एका हॉटेलच्या बाहेर अर्धा तास रांगेत उभी होती, मात्र, तिला कुणीचं ओळखलं नाही. या अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ही अभिनेत्री आहे नयनतारा.नयनताराची लोकप्रियता आता केवळ दक्षिणेपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटात काम करण्यापूर्वीही हिंदी सिनेसृष्टीत ती लोकप्रिय होती. 'जवान'नंतर तिच्या फॅन्समध्ये भरघोस वाढ झाली आहे. असे असले तरीही तिला कुणीही ओळखलं नाही. नयनताराच्या बाबतीत नुकताच एक आश्चर्यकारक किस्सा घडला आहे.
नयनतारा पती विघ्नेश शिवनसोबत दिल्लीतील एका रेस्टॅारंटमध्ये डिनरसाठी गेली होती. याबाबतचा व्हिडिओ विघ्नेशने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की नयनतारा आणि विघ्नेश हे हॉटेलमध्ये सामान्यांप्रमाणे बसून जेवण करत आहेत. तर शेजारी बसलेल्या लोकांनीही त्यांना त्रास दिला नाही. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले की, "बऱ्याच वर्षांनंतर 17 नोव्हेंबरला अगदी साध्या पद्धतीने वाढदिवसाची पुर्वसंध्याकाळ साजरा केली. अगदी वैयक्तिक आणि अतिशय चविष्ट जेवण केले. दिल्लीत आम्ही दोघेच होतो. टेबल मिळवण्यासाठी आम्ही अर्धा तास रांगेत उभे होतो. मग आम्हाला सेंट्रल टेबल मिळाला.खूप दिवसांनी मनापासून आनंद झाला आणि अनेक अविस्मरणीय क्षण निर्माण झाले". या पोस्टवर नयनताराने "आजवरचा बेस्ट बर्थडे डिनरठ, अशी कमेंट केली आहे.
नयनतारा अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिच्या करिअरपासून तिची लव्हस्टोरी आणि विघ्नेशसोबतच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ही डॉक्युमेंट्री तिच्या वाढदिवशी स्ट्रीम करण्यात आली. यात नयनताराच्या आयुष्यातील सर्व चांगले-वाईट पैलू पाहायला मिळालेत. नयनतारा आणि विघ्नेश हे जुळ्या मुलांचे पालक आहेत.