OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:50 IST2025-03-26T16:49:21+5:302025-03-26T16:50:35+5:30

नयनतारा, आर. माधवन आणि सिद्धार्थ यांचा 'Test' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Nayanthara, R. Madhavan And Siddharth's Starring Film 'test' Will Be Released Directly On Netflix On 4 April 2025 | OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

OTTवर येतोय ननतारा, माधवन आणि सिद्धार्थचा Test चित्रपट, ट्रेलर प्रदर्शित, सिनेमा कुठे बघाल?

लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी नयनतारा (Nayanthara), अष्टपैलू अभिनेता आर. माधवन आणि सिद्धार्थ हे 'Test' या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.  नुकतंच 'Test' या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.  जेव्हा तीन दमदार कलाकार पडद्यावर एकत्र येतात, तेव्हा काय होतं, हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येतंय. 'टेस्ट' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. तो कधी आणि कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, हे जाणून घेऊया. 

'Test' चित्रपटात सिद्धार्थ हा एक क्रिकेटपटू, नयनतारा ही एक शिक्षिका आणि तिचा पती आर. माधवन हा शास्त्रज्ञ आहे, जो एक कॅन्टीन चालवतोय. २ मिनिटे ५० सेकंदांच्या ट्रेलरमध्ये क्रिकेटपटू, शास्त्रज्ञ आणि एका शिक्षकाचं जीवन एका मनोरंजक पद्धतीने गुंफल्याच पाहायला मिळतंय. एस शशिकांत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये काली वेंकट, नास्सर आणि विनय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्स्कुता शिगेला पोहचली आहे. 

महत्वाकांक्षा, प्रेम, कर्तव्य आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाचे एक उदाहरण  असलेला हा चित्रपट येत्या ४ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. तो थेट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाईल. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये तो पाहता येणार आहे. 
 

Web Title: Nayanthara, R. Madhavan And Siddharth's Starring Film 'test' Will Be Released Directly On Netflix On 4 April 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.