ना शाहरुख, ना सलमान, रजनीकांत ठरले देशातील सर्वात महागडे अभिनेते, मानधन वाचून चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:57 PM2023-11-04T14:57:28+5:302023-11-04T14:59:18+5:30
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. थलावया अशी ओळख मिळवलेले रजनीकांत ७२व्या वर्षीही कलाविश्वात कार्यरत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी असलेल्या रजनीकांत यांनी अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. थलावया अशी ओळख मिळवलेले रजनीकांत ७२व्या वर्षीही कलाविश्वात कार्यरत आहेत. रजनीकांत यांच्या 'जेलर' सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडित काढत, जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला जेलर हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
‘जेलर'च्या यशानंतर निर्माते कलानिधी मारन यांनी रजनीकांत यांना दिलेला चेक 100 कोटींचा चेक दिला होता. हा चेक जेलरच्या नफ्यातील वाटा होता. यापूर्वीच रजनीकांत यांना चित्रपटासाठी 110 कोटी रुपये फी घेतली होती. म्हणजेच, रजनीकांत यांना जेलरसाठी एकूण 210 कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच रजनीकांत देशातील सर्वात महागडे अभिनेते झाले आहेत.'
याच सिनेमादरम्यान आता त्यांच्या फीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.लोकेश कनागराजच्या आगामी सिनेमासाठी ते किती फी घेत आहे हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. रिपोर्ट्स नुसार, थलावया चित्रपटासाठी 260-270 कोटी रुपये घेत आहे. सुपरस्टार रजनीकांतचे सध्या दोन मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यापैकी एक लोकेश कनागराजसोबतचा आगामी चित्रपट 'थलैवर 171' आहे. या चित्रपटाशी संबंधित माहितीनुसार, रजनीकांत थलायवर 171 साठी सुमारे 260 ते 270 कोटी रुपये घेत आहेत.जर अभिनेत्याशी संबंधित ही माहिती खरी असेल तर रजनीकांत हे देशातील सर्वात महागडे अभिनेते असतील.