मिश्किल चेहरा अन् डोळ्यावर गॉगल, प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:09 IST2025-01-14T15:05:21+5:302025-01-14T15:09:01+5:30

डोळ्यांना गॉगल अन्...; मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज.

on the oaccassion of makar sankarnti 2025 south actor prabhas upcoming film the rajasaab new poster out  | मिश्किल चेहरा अन् डोळ्यावर गॉगल, प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा

मिश्किल चेहरा अन् डोळ्यावर गॉगल, प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाच्या नव्या पोस्टरची चर्चा

Prabhas The Rajasaab New Poster: 'कल्कि 2898  एडी', 'सालार', 'बाहुबली' यांसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर साउथ स्टार, अभिनेता प्रभास  नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास (Prabhas) सध्या'द राजा साब' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे.  दिग्दर्शक मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'द राजा साब' चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अशातच नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये प्रभासचा लूक पाहून चाहत्यांना चित्रपटाबद्दल क्रेझ निर्माण झाली आहे.


अभिनेता प्रभासने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी अभिनेत्याने 'द राजा साब' चित्रपटाचं नवं पोस्टरची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास डोळ्यांना गॉगल अन् गालावर हसू अशा हॅंडसम लूकमधे दिसतो आहे. 

पीपल मीडिया फॅक्टरी प्रस्तुत, 'द राजा साब' या हॉरर कॉमेडी चित्रपट यंदा २०२५ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'कल्कि 2898  एडी', 'सालार' नंतर प्रेक्षकांना प्रभासकडून फार अपेक्षा देखील आहेत. या चित्रपटाचं कथानक एका माणसाच्या अवतीभोवती फिरणारं आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्याची नजर आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर असते. परंतु अखेरीस त्याला या हवेलीमध्ये 'राजा साब' यांचा आत्मा असल्याचं कळतं आणि मग चित्रपटाच्या खऱ्या स्टोरीला सुरुवात होते. 

Web Title: on the oaccassion of makar sankarnti 2025 south actor prabhas upcoming film the rajasaab new poster out 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.