पंतप्रधान मोदींचा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन, थलैवाच्या प्रकृतीची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:10 PM2024-10-02T12:10:09+5:302024-10-02T12:11:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी 30 सप्टेंबर रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रजनीकांत यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.
चेन्नईतील अपोलो रुग्णालयात 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर उपचार पार पडले आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीची फोन करुन विचारपूस केली. मोदींनी रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत यांना फोन करुन थलैवाच्या तब्येतीची माहिती घेतली, तसंच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती शेअर केली आहे.
Our Hon. PM Thiru @narendramodi avl spoke telephonically to Smt. Latha Rajinikanth avl today to inquire about the health of our Super Star Thiru @rajinikanth avl.
— K.Annamalai (@annamalai_k) October 1, 2024
Hon PM was informed about the well-being of Thiru Rajinikanth avl post-surgery & Hon PM wished him a speedy… pic.twitter.com/dvneX2IJju
तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमती लता रजनीकांत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. माननीय पंतप्रधानांना शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आणि पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या".
Bulletin from Apollo 🙏🙏🙏
— 𝐌𝐚𝐧𝐨 (@rajini_mano) October 1, 2024
Get well soon Thalaivaa 💜💜💜@rajinikanth#Rajinikanth𓃵pic.twitter.com/u6jAFKu8ba
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन आणि मेगास्टार कमल हासन यांनीही यांनीही रजनीकांत यांना उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अपोलो हॉस्पिटल चेन्नईने रजनीकांतच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, रजनीकांत यांना 30 सप्टेंबर 2024 रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीला सूज आली होती. ज्यावर ट्रान्सकॅथेटरद्वारे शस्त्रक्रिया न करता उपचार करण्यात आले. रजनीकांत आता स्थिर आणि निरोगी आहेत. दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल.