प्रभासच्या 'सालार' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 07:15 PM2023-12-12T19:15:40+5:302023-12-12T19:17:20+5:30

प्रभासचे चाहते 'सालार' चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Prabhas' 'Saalar' gets 'A' certificate from Censor Board | प्रभासच्या 'सालार' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

प्रभासच्या 'सालार' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. 3 मिनिटे 47 सेकंदांच्या रनटाइमसह चित्रपटाचा जबरदस्त प्रोमो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 2 तास 55 मिनिटांचा रनटाइम असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

'सालार'  चित्रपटात प्रभाससोबत साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन देखील आहे. दोघेही बेस्ट फ्रेंड देवा आणि वरधाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पृथ्वीराजने नुकतेच या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले आहे. एकाच चित्रपटातील एकाच व्यक्तिरेखेसाठी 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग त्याने पहिल्यांदाच केले आहे.  पृथ्वीराजनं सोशल मीडियावर स्टुडिओमधील एक फोटो शेअर केला.  

कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'सालार फायनल डबिंग करेक्शन केलं. मी गेली अनेक वर्षे काम केलेल्या विविध भाषांमधील माझ्या सर्व पात्रांसाठी माझा स्वतःचा आवाज देण्याची संधी मिळाली. मी माझ्या काही पात्रांसाठी अनेक भाषांमध्ये डबिंगही केले आहे. पण एकाच व्यक्तिरेखेसाठी चित्रपटात 5 वेगवेगळ्या तेलुगु, कन्नड, तामिळ, हिंदी आणि मल्याळम  भाषांमध्ये डबिंग केले आहे. देवा आणि वरधा तुम्हाला 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये भेटतील'.

साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा चित्रपट 22 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू या कलाकारांचा समावेश आहे. तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत येणारा हा चित्रपट शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाला टक्कर देणार आहे. 
 

Web Title: Prabhas' 'Saalar' gets 'A' certificate from Censor Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.