मुलाच्या मृत्यूनंतर प्रकाश राज यांचा झालेला घटस्फोट, १२ वर्ष लहान मुलीसोबत पुन्हा थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:28 AM2024-03-26T10:28:00+5:302024-03-26T10:29:35+5:30
नक्की कसा झाला होता प्रकाश राज यांच्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
दाक्षिणात्य अभिनेते आणि 'सिंघम' चा व्हिलन प्रकाश राज (Prakash Raj) आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांचंच मन जिंकलं. शिवाय ते आपल्या बेधडक विधानांमुळेही चर्चेत असतात. साऊथमध्ये तर त्यांची लोकप्रियता आहेच पण अजय देवगण, रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमात त्यांनी जी काय कमाल केली त्यानंतर बॉलिवूडही त्यांच्या प्रेमात पडलं. प्रकाश राज यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही वर्षांपूर्वी वादळ आलं होतं. यात त्यांचा पहिला घटस्फोटही झाला.
प्रकाश राज यांनी 1994 साली अभिनेत्री ललिता कुमारीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना मेघना, पूजा या दोन मुली आणि सिद्धू हा मुलगा झाला. सुखी संसार सुरु असतानाच मुलाच्या मृत्यूनंतर सर्वकाही उद्ध्वस्त झालं. 2004 साली पतंग उडवताना त्यांचा 5 वर्षीय मुलगा सिद्धू पडला. त्याला इतका गंभीर मार लागला की डॉक्टरही वाचवू शकले नाहीत. प्रकाश राज यांनी शेतातच मुलाच्या पार्थिवाला अग्नी दिला. ते म्हणाले होते की, 'मी अनेकदा तिकडे जातो तेव्हा मला हतबल झाल्यासारखे वाटते.'
सिद्धूच्या मृत्यूनंतर प्रकाश राज आणि पत्नी ललिता यांच्यात मतभेद सुरु झाले. दरदिवशी दोघांमध्ये काही ना काही कारणाने वाद होत होते. परिणामी त्यांचा 2009 साली घटस्फोट झाला. पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर एक वर्ष होतं तोच प्रकाश राज यांनी १२ वर्ष लहान कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत 24 ऑगस्ट 2010 रोजी लग्न केलं. लग्नानंतर 5 वर्षांनी पोनीने वेदांत या मुलाला जन्म दिला.
प्रकाश राज यांना 5 राष्ट्रीय पुरस्कार, 5 फिल्मफेअर आणि 3 विजय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या राजकीय वक्तव्यांवरुन अनेकदा वादही झाला आहे. वैयक्तिक आयुष्यातही त्यांना अनेक समस्यांमधून जावं लागलं.