निर्माते के पी चौधरी यांची गोव्यात आत्महत्या, रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमाची केली होती निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:04 IST2025-02-04T09:04:01+5:302025-02-04T09:04:43+5:30
निर्मात्याने का उचललं टोकाचं पाऊल?

निर्माते के पी चौधरी यांची गोव्यात आत्महत्या, रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमाची केली होती निर्मिती
मनोरंजनविश्वात अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी काम नसल्याने नैराश्य येऊन टोकाचं पाऊल उचललं आहे. कोरोना काळात तर अशा बऱ्याच घटना कानावर आल्या होत्या. अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही आत्महत्या केली. अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांच्या 'कबाली' सिनेमाचे निर्मातेके के पी चौधरी (K P Choudhary) यांनी गोवा येथे आत्महत्या केली आहे. आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, फिल्ममेकर सुंकारा कृष्ण प्रसाद चौधरी हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यांना याआधी ड्रग्स केससंदर्भात अटकही झाली होती. २०२३ मध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांना ड्रग्स केसमध्ये अटक केली होती. तसंच ते आर्थिक संकटाचाही सामना करत होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
के पी चौधरी टॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कबाली' सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाने ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. ड्रग्स केसनंतर त्यांच्या आर्थिक संकट आलं. त्या केसमध्ये त्यांच्याकडे बॉलिवूड क्लाएंट्स असल्याचंही तपासात समोर आलं होतं. तसंच या केसनंतर त्यांना इंडस्ट्रीत यश मिळालं नाही. त्यांनी गोव्यात ओएचएम पबही सुरु केलं होतं जिथे ते कथितरित्या ड्रग्सचा धंदा करायचे.