Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:08 PM2024-12-02T12:08:03+5:302024-12-02T12:09:38+5:30

'पुष्पा २'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. 

Pushpa 2 allu arjun rashmika mandanna movie advance booking collection | Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

Pushpa 2 :  अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २'ची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. अखेर हा सिनेमा ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' सिनेमासाठी ३० नोव्हेंबरपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अवघ्या दोनच दिवसांत 'पुष्पा २'ची तब्बल ६.७४ लाख तिकिटे विकली गेली आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने जोरदार कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर ४८ तासांमध्येच अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे शो हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच 'पुष्पा २'ने तब्बल २२ कोटींची कमाई केली आहे. 

'पुष्पा २ : द रुल' हा सिनेमा तेलुगु, हिंदी, मल्याळम, तमिळ आणि कन्नज अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 2D, 3D आणि IMAX व्हर्जनमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'पुष्पा २'च्या हिंदी व्हर्जनने प्रदर्शनाआधीच १०.२९ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तेलुगु व्हर्जननेही १०.८९ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता 'पुष्पा २' अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

'पुष्पा २' सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहून 'पुष्पा २' पहिल्याच दिवशी ३०० कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: Pushpa 2 allu arjun rashmika mandanna movie advance booking collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.