अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:00 AM2024-11-27T11:00:07+5:302024-11-27T11:00:32+5:30

'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट समोर आली असून सिनेमा किती तासांचा असणार, याबद्दल माहिती बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (pushpa 2)

pushpa 2 movie runtime starring allu arjun rashmika mandanna fahad faasil | अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2'ची उत्सुकता सध्या शिगेला आहे. २०२१ साली आलेल्या 'पुष्पा'चा पुढचा भाग असलेला 'पुष्पा 2' रिलीज व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. अशातच 'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट समोर येतेय. 'पुष्पा 2' किती लांबीचा असणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. 'पुष्पा 2' किती तासांचा असणार? याबद्दल मीडिया रिपोर्ट असणार आहे.

'पुष्पा 2'च्या रनटाइमबद्दल मोठी अपडेट

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' किती लांबीचा असणार याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. 'पुष्पा 2' तब्बल ३ तास २१ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पैसा वसूल मनोरंजन मिळणार यात शंका नाही. 'पुष्पा'चा पहिला भाग २ तास ५८ मिनिटांचा होता. आता 'पुष्पा 2' पहिल्या भागापेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना थिएटरमध्ये नक्कीच मजा येईल यात शंका नाही. 

'पुष्पा 2'बद्दल बरंच काही

अल्लू अर्जुनरश्मिका मंदानाची भूमिका असणारा 'पुष्पा २' सिनेमा ५ डिसेंबर २०२४ ला जगभरात प्रदर्शित होतोय. 'पुष्पा २' पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत. पुन्हा एकदा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने 'पुष्पा २'साठी हिंदी डबिंग केलंय. या सिनेमात पहिल्या भागात झळकलेला अभिनेता फहाद फासिल पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पुष्पाला भिडताना दिसणार आहे. याशिवाय सिनेमात आणखी कोणते नवीन कलाकार असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: pushpa 2 movie runtime starring allu arjun rashmika mandanna fahad faasil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.