अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:48 PM2024-11-22T14:48:23+5:302024-11-22T14:49:00+5:30

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे.

Pushpa 2 The Rule Controversy Complaint Against Pushpa 2 For Hurting Hindu Sentiments In Haryana Controversy Over Allu Arjun Maa Kali Avatar | अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

Pushpa 2 The Rule Controversy : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa: The Rule) या चित्रपटाची जगभराच चर्चा आहे. 'पुष्पा 2: द रुल' हा सिनेमा 2024 मधील मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी एक आहे. येत्या  ५ डिसेंबर २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते तर सिनेमा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. पण,  आता हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे.

 'पुष्पा 2: द रुल'च्या एका सीनविरोधात हरियाणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, हरियाणातील हिसारमध्ये 'पुष्पा 2: द रुल' बाबत बराच गदारोळ सुरू आहे. हिसारमधील एका गावात या चित्रपटाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिसार येथील कुलदीप कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 कुलदीप कुमार यांची तक्रार आहे की, 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीश्वरच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. त्यात 'माँ काली'चे चित्रही दिसते. त्यांच्या मते या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.  'माँ काली' आणि अल्लू अर्जुनचा अर्धनारीश्वरचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी  कुलदीप कुमार यांनी केली आहे. तसे न केल्यास हरियाणात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. 

'पुष्पा 2: द रुल' विरोधात पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सिनेमात अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री श्रीलीलाचं आयटम साँग आहे.  या सिनेमात पहिल्या भागात झळकलेला अभिनेता फहाद फासिल पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पुष्पाला भिडताना दिसणार आहे.
 

Web Title: Pushpa 2 The Rule Controversy Complaint Against Pushpa 2 For Hurting Hindu Sentiments In Haryana Controversy Over Allu Arjun Maa Kali Avatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.