'Pushpa 2' मधील नवं गाणं 'पीलिंग्स'! अल्लू अर्जून-रश्मिकाचा धमाकेदार डान्स एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:26 AM2024-12-02T10:26:26+5:302024-12-02T10:28:07+5:30
'Pushpa-2' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.
Pushpa 2: 'पुष्पा: द रुल' हा 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा सीक्वल येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सिनेरसिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. पुष्पा सिनेमाप्रमाणे त्याच्या पहिल्या भागातील 'ऊ अंटावा', 'बलम सामे', ही गाणी प्रचंड गाजली. त्यामुळे दुसऱ्या भाग कसा असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'पुष्पा-२' च्या जबरदस्त ट्रेलरनंतर आता 'पीलींग्स' या सुपरहिट गाण्याने त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'पुष्पा-२' च्या दुसऱ्या भागातील 'पुष्पा पुष्पा' गाण्यात प्रेक्षकांनी पुष्पाचा रुद्रावतार पाहिला. त्यानंतर 'अंगारो' गाण्यामध्ये श्रीवल्लीची अदाकारी आणि 'किसीक' गाण्याने अनेकांना थिकरण्यास भाग पाडलं. आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या दमदार केमिस्ट्रीने परिपूर्ण असलेलं पीलिंग्स गाण्याने प्रेक्षकाचं लक्ष वेधलं आहे.
पुष्पाराज आणि श्रीवल्लीची साऊथ इंडियन स्टाईल आणि डान्स या गाण्यामध्ये पाहायला मिळतो आहे. 'पुष्पा-२' मधील 'पीलिंग्स' हे गाणं रविवारी ( १ डिसेंबर) च्या दिवशी टी सिरिजच्या युट्यूबरवर प्रसारित करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच या गाण्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'पुष्पा-२' या सिनेमाबद्दल लोकांच्या मनात उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण ५ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा-२' तब्बल ३ तास २१ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पैसा वसूल मनोरंजन मिळणार यात शंका नाही. 'पुष्पा'चा पहिला भाग २ तास ५८ मिनिटांचा होता. आता 'पुष्पा -२' पहिल्या भागापेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना थिएटरमध्ये नक्कीच मजा येईल यात शंका नाही.