'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:18 IST2024-03-06T11:17:59+5:302024-03-06T11:18:27+5:30
पुष्पा 2 यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. त्याआधीच पुष्पा 3 चंही अपडेट समोर आलं आहे.

'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...
Pushpa Movie Update: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) सिनेमाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्टमध्ये पुष्पाचा सीक्वेल भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या भागाच्या रिलीजआधीच पुष्पा 3 (Pushpa 3) चीही चर्चा सुरु झाली आहे. पुष्पा 3 बद्दल नवीन अपडेट समोर आलं आहे. तिसऱ्या भागाचंही थोडं शूटिंग झालं आहे आणि पुढील वर्षी 2025 मध्येच सिनेमा रिलीज होईल असा अंदाज आहे.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, पुष्पा या सुपरहिट फ्रँचायझीचा तिसरा भाग २०२५ पर्यंत सिनेमागृहात प्रदर्शित होईल. तेलुगू 360 च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दिग्दर्शक सुकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच पुष्पा 3 च्या काही भागाचं शूट केलं आहे आणि बाकी शूटिंगचीही योजना आखली आहे. यासोबतच सिनेमा २०२५ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात रिलीज करण्यावरही विचार सुरु आहे. तरी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अल्लू अर्जुनने काही दिवसांपूर्वीच तिसरा भाग येईल असं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, 'तुम्ही नक्कीच तिसऱ्या पार्टची आशा ठेवू शकता. आम्हाला ही एक फ्रँचायझी बनवायची आहे आणि आमच्याकडे तशी इंटरेस्टिंग स्क्रीप्टही आहे.' सध्या पुष्पा 2 चं शूटिंग सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये अल्लू अर्जुनला झालेल्या दुखापतीमुळे शूटिंगमध्ये अडथळे आले. काही आठवड्यांसाठी शूट थांबलं होतं.
'पुष्पा : द राइज' 2021 साली रिलीज झाला होता. सुकुमार यांनी दिग्दर्शनासोबतच स्क्रीप्टही लिहिली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. तसंच अल्लू अर्जुनने तर भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. 'श्रीवल्ली' हे अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचं गाणं, त्यांची केमिस्ट्रीही हिट झाली. शिवाय समंथा रुथ प्रभूसोबतचं त्याचं 'ऊ अंटावा' हे गाणंही गाजलं.