रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 01:21 PM2024-10-27T13:21:56+5:302024-10-27T13:22:16+5:30

'वेट्टैयान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Rajinikanth-amitabh Bachchan Starrer Vettaiyan Ott Release Update | रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

Vettaiyan Ott Release : थिएटरनंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये ओटीटी रिलीजची प्रचंड क्रेझ आहे. सध्या प्रेक्षकांमध्ये रजनीकांत स्टारर 'वेट्टैयान' या चित्रपटासाठी अशीच उत्सुकता आहे. हा ॲक्शन थ्रिलर OTT प्लॅटफॉर्मवर कधी स्ट्रीम होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशातच आता ओटीटी रीलीजबाबत अपडेट समोर आलं आहे. 

रजनीकांत यांचा 'वेट्टैयान' हा दसऱ्याच्या मुहूर्तावर 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. Amazon Prime Video ने  'वेट्टैयान' स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. हा सिनेमा दिवाळीनंतर ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख जाहीर केली नसली तरी 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निर्मात्यांनी किंवा Amazon Prime Video ने  सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे आणि 'हम' चित्रपटाच्या तब्बल 33 वर्षांनंतर दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटात रजनीकांत यांनी आयपीएस अधिकाऱ्याची तर अमिताभ बच्चन यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. यात फहाद फासिल आणि राणा दग्गुबती यांच्याही भूमिका आहेत.  रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची जोडी 33 वर्षांनंतर पडद्यावर परतली आहे. दोघांनी 'हम' चित्रपटात काम केले होते.

Web Title: Rajinikanth-amitabh Bachchan Starrer Vettaiyan Ott Release Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.