'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:01 AM2024-02-09T11:01:36+5:302024-02-09T11:02:30+5:30

Rajinikanth: रजनीकांत यांनी घेतलेलं मानधन प्रचंड मोठं असून त्याचा आकडा ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत.

rajinikanth-charges-rs-1-cr-per-minute-for-40-minute-role-in-lal-salaam | 'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार अर्थात रजनीकांत (rajinikanth) यांच्या अभिनयाविषयी आणि लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगायला नको. आपल्या सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते कायम त्यांच्या दारापुढे रांग लावत असतात. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले असून नुकताच त्यांचा 'लाल सलाम' हा सिनेमात रिलीज झाला आहेत. 'लाल सलाम' या सिनेमाच्या टीझरची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती. त्यात नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या  सिनेमासाठी त्यांनी तगडं मानधन घेतलं आहे.

'लाल सलाम' या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिने केलं असून या सिनेमात अभिनेता कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांच्या रोलसाठी त्यांनी तगडं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.

टॉलिवूडमधील महागडा अभिनेता म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे या सिनेमासाठीही त्यांनी प्रचंड मोठ मानधन घेतलं आहे. रजनीकांत यांचा या सिनेमात ३० ते ४० मिनिटांचा रोल असून यासाठी त्यांनी अव्वाच्या सव्वा मानधन घेतलं आहे. 'ट्रॅक टॉलिवूड. कॉम'च्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी या सिनेमामध्ये एका मिनिटांसाठी तब्बल १ कोटी रुपये चार्ज केले आहेत. त्यानुसार, त्यांनी एकूणच या सिनेमासाठी ४० कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, लाल सलाम हा स्पोर्ट्स ड्रामा प्रकारात मोडणारा सिनेमा असून यात विष्णी आणि विक्रांत लीड रोलमध्ये आहेत. 

Web Title: rajinikanth-charges-rs-1-cr-per-minute-for-40-minute-role-in-lal-salaam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.