रजनीकांतच्या चाहत्यांचा सातासमुद्रापार प्रवास, Jailer पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:01 PM2023-08-10T14:01:00+5:302023-08-10T14:02:15+5:30

जपानचं एक कपल सातासमुद्रापार चेन्नईत फक्त रजनीकांतचा सिनेमा बघायला आलं आहे.

Rajinikanth fans travel across seven seas Japanese couple arrives in Chennai to watch Jailer | रजनीकांतच्या चाहत्यांचा सातासमुद्रापार प्रवास, Jailer पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत दाखल

रजनीकांतच्या चाहत्यांचा सातासमुद्रापार प्रवास, Jailer पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत दाखल

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि त्यांचे चाहते यांच्यात किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. रजनीकांतचा 'जेलर' (Jailer) सिनेमा आज रिलीज झाला असून चाहत्यांनी थिएटरबाहेर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. रजनीकांत केवळ अभिनेताच नसून चाहते त्याला देवच मानतात. त्याची पूजा करतात. देवाचा सिनेमा रिलीज होणार म्हणल्यावर तिथल्या सरकारने चक्क सुट्टीही जाहीर केली आहे. पण थलायवा रजनीची ही क्रेझ फक्त भारतातच नाही तर देशाबाहेरही आहे. म्हणून जपानचं एक कपल सातासमुद्रापार चेन्नईत फक्त रजनीकांतचा सिनेमा बघायला आलं आहे.

'जेलर'ची क्रेझ जपानी चाहत्यांमध्येही पसरली आहे. जपानचं एक कपल भारतात दाखल झालं आहे. तमिळनाडू मध्ये जाऊन ते देखील 'जेलर' सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडप्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ज्यात ते रजनीकांतचे किती मोठे चाहते आहेत हे सांगत आहे. Yasuda Hidetoshi म्हणाले, 'आम्ही ओसाकावरुन जेलर पाहण्यासाठी भारतात आलो आहोत. सध्या चेन्नईमध्ये आहोत. आम्हाला रजनीकांत आणि त्यांचे चित्रपट खूप आवडतात. आज जेलर पाहायचा म्हणून आम्ही भारतात आलो आहोत.'

Video : थलायवा रजनीकांतच्या चाहत्यांचा धुमाकूळ, Jailer रिलीज होताच थिएटरबाहेर जल्लोष

अशा प्रकारची क्रेझ केवळ रजनीकांतचीच असू शकते. याआधीही रजनीकांतचे चित्रपट पाहण्यासाठी जपानी लोक भारतात आले आहेत. रजनीच्या 'लिंगा' सिनेमासाठीही चाहत्यांची अशीच क्रेझ दिसून आली होती. 'जेलर' ब्लॅक कॉमेडी अॅक्शन फिल्म आहे. ट्रेड अॅनालिस्टनुसार, पहिल्याच दिवशी सिनेमाने ४० ते ४५ कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. भारतात पहिल्या चारच दिवसात सिनेमा १०० कोटी गाठू शकेल.आता सिनेमा खरंच किती यश मिळवतो हे काहीच दिवसात स्पष्ट होईल. जेलरमध्ये रजनीकांतसोबतच राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू, जॅकी श्रॉफ, मोहनलाल, विनायकन यांच्याही भूमिका आहेत.

Web Title: Rajinikanth fans travel across seven seas Japanese couple arrives in Chennai to watch Jailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.