अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:36 IST2024-03-05T16:35:46+5:302024-03-05T16:36:30+5:30
अंबानीच्या लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या रजनीकांत यांना या कृतीमुळे लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलंय

अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप
भारतीय मनोरंजन विश्वातील सुपरस्टार अभिनेते म्हणजे रजनीकांत.रजनीकांत त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असतात. अलीकडेच रजनीकांत यांनी बिझनेस नव्हे तर इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केल्याने सर्वांनी त्यांच्या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. पण नुकतंच एका व्हिडीओमुळे रजनीकांत यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय. काय घडलंय असं?
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, अनंंत अंबानींच्या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेले रजनीकांत मीडियाला पाहून थांबतात. आणि त्यांच्या कुटुंबासोबत फोटोसाठी पोज देतात. अशातच रजनीकांतच्या कुटुंबाचं सामान सांभाळणारी हाऊस हेल्पर त्यांच्या मागे येऊन उभी राहते. पुढे रजनीकांत यांनी हाताचा इशारा करुन तिला बाजूला जाण्यास सांगितलं. रजनीकांत यांनी ज्या पद्धतीने तिला जायला सांगितलं ती कृती लोकांना अजिबात आवडलेली दिसली नाही.
Cheapest behaviour from #Rajinikanth!pic.twitter.com/uw0opzNdsZ
— Kolly Censor (@KollyCensor) March 3, 2024
रजनीकांत यांना या कृतीमुळे सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलंय. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'अभिनेते फक्त चांगल्या लोकांसारखे वागताना दाखवतात पण प्रत्यक्षात?' एकाने म्हटले, 'रजनीकांत, हे काय आहे? मला आश्चर्य वाटते, तुम्ही प्रत्यक्षात वेगळे आहेत.' अशाप्रकारे लोकांनी रजनीकांत यांच्या वागण्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.