वाढदिवशी राम चरणचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! कियारा अडवाणीसोबत 'गेम चेंजर' मधील पहिलं गाणं भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:31 IST2024-03-27T15:30:19+5:302024-03-27T15:31:56+5:30
राम चरणच्या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं जरागंडी भेटीला आलाय. पाय थिरकवणारं हे गाणं तुम्हीही ऐका

वाढदिवशी राम चरणचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! कियारा अडवाणीसोबत 'गेम चेंजर' मधील पहिलं गाणं भेटीला
साऊथ सुपरस्टार आणि RRR फेम राम चरण हा सर्वांचा लाडका अभिनेता. राम चरण सध्या त्याच्या आगामी सिनेमांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. राम चरणच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. त्याचं नाव 'गेम चेंजर'. राम चरणने 'गेम चेंजर' मधील पहिलं गाणं भेटीला आणलंय. विशेष म्हणजे, आज स्वतःच्या वाढदिवशी राम चरणने हे नवीन गाणं रिलीज केलं. या गाण्यात राम सोबत कियारा अडवाणीही झळकत आहे.
'जरागंदी'असं या गाण्याचं नाव असून गाण्यात रामसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकत आहे. राम आणि कियारा दोघेही पारंपरिक वेशभूषा करुन खुप सुंदर दिसत आहेत. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग असा जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केलाय. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ पाहून या गाण्याचा म्यूजिक व्हिडीओमध्ये राम आणि कियारा कसे थिरकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
सुप्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि सुनिधी चौहान यांनी हे गाणं गायलंय. राम चरणच्या 'गेम चेंजर' सिनेमाबद्दल सांगायचं तर, 'शिवाजी द बॉस' फेम शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. राम चरण, कियारा अडवाणी, अंजली, समुथिराकानी, सुर्या, श्रीकांत आणि सुनील हे प्रसिद्ध कलाकार सिनेमात झळकणार आहेत. राम चरणची प्रमुख भूमिका असलेला 'गेम चेंजर' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.