ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:59 IST2025-03-27T14:58:56+5:302025-03-27T14:59:55+5:30

भारतीय मनोरंंजन विश्वातील आगामी सिनेमा पेड्डीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जाणून घ्या सिनेमाविषयी सर्वकाही

ram charan peddi movie first look starring jahnavi kapoor divyendu sharma | ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

ओठात बिडी, नाकात रिंग अन् डोळ्यात अंगार! 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'पेड्डी', 'हा' सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

२०२४ च्या शेवटी रिलीज झालेल्या 'पुष्पा २'(pushpa 2) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. "झुकेगा नही साला" म्हणणाऱ्या पुष्पाला टक्कर द्यायला एक नवीन सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून सर्वांचं लक्ष या पोस्टरने वेधलंय. 'पेड्डी'(peddi) असं या सिनेमाचं नाव आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बुची बाबू सना (उप्पेना) यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील सुपरस्टार अभिनेता या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

हा अभिनेता 'पेड्डी'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

'पेड्डी' सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे राम चरण. RRR सिनेमातून ज्याच्या अभिनयाचा डंका जगात वाजला असा राम चरण या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. डोळ्यांत अंगार, विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि नाकातील अंगठी अशा हटके लूकमध्ये राम चरणला सर्वांसमोर प्रेझेंट करण्यात आलंय.  दुसऱ्या पोस्टरमध्ये राम चरणकडे जुनी क्रिकेट बॅट दिसत आहे. राम चरणची व्यक्तिरेखा किती खतरनाक असणार, याचा अनुभव पोस्टरमधून सर्वांना येतोय.


'पेड्डी' सिनेमात राम चरणसोबत जान्हवी कपूर, शिवराजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदू शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  बुची बाबू सना यांनी हा सिनेमा लिहिला असून दिग्दर्शित केला आहे. मैत्री मूव्ही मेकर्स आणि सुकोमर रायटिंग्ज यांनी हा सिनेमा प्रस्तुत केला असून वृद्धी सिनेमाच्या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची निर्मिती व्यंकट सत्येश किलारू यांनी केली आहे. तर ए.आर. रहमान यांचं संगीत सिनेमाला आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होईल.

Web Title: ram charan peddi movie first look starring jahnavi kapoor divyendu sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.