Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:35 PM2024-07-31T12:35:31+5:302024-07-31T12:35:52+5:30

'पुष्पा 2' च्या सेटवरून क्लायमॅक्स सीन लीक झाला आहे.

Rashmika Mandanna and Allu Arjun Pushpa 2 Video climax scene Leaked | Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ( Allu Arjun) बहुचर्चित 'पुष्पा 2' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत.  अल्लू अर्जुन-फहाद फाजिल-रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा मोस्ट अवेटेड सिनेमांच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे. काहीच दिवसांपुर्वी 'पुष्पा 2' ची रिलीज डेट जाहीर झाली. पण, यातच आता  'पुष्पा 2' च्या सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या ( Pushpa 2 climax scene Leaked) शूटिंगदरम्यान काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि क्रू मेंबर्स एक फाईट सीन शूट करताना दिसून येत आहेत. व्हिडीओमध्ये, रक्ताने माखलेला माणूस हार्नेस (केबल) ला लटकलेला दिसतोय.  तर इतर लोक सेटअपमध्ये मदत करताना दिसत आहेत. मात्र, या क्लिपमध्ये रश्मिका किंवा अल्लू अर्जुन पाहायला मिळत नाहीयेत.

क्लायमॅक्स सीनचा हा व्हिडीओ पाहून चाहते मात्र भडकले आहेत.  हा व्हिडीओ इंटरनेटवरून हटवण्याची विनंती त्यांनी केली आहे. मात्र, 'पुष्पा 2'चे कोणतेही फुटेज लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, रश्मिका मंदान्ना ही तिचं पात्र श्रीवल्लीच्या गेट-अपमध्ये दिसली होती.

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' या वर्षी 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. 

Web Title: Rashmika Mandanna and Allu Arjun Pushpa 2 Video climax scene Leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.