अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:24 AM2023-11-13T11:24:09+5:302023-11-13T11:26:34+5:30

डेटिंग रुमर्सच्यामध्ये रश्मिका आणि विजय दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली.

Rashmika mandanna celebrate diwali with vijay deverakonda amid dating rumors same caption deep fake | अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

अफेअरच्या चर्चेदरम्यान Rashmikaआणि Vijay Deverakonda एकत्र सेलिब्रेटी केली दिवाळी, फोटोंनी केली पोलखोल

गेल्या काही दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवराकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात दिवाळीच्या मुहूर्तावर या चर्चांना बळ मिळालं आहे. डेटिंग रुमर्सच्यामध्ये रश्मिका आणि विजय दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली. 

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. विजयने फटाके फोडतानाचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत, तर रश्मिकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री साडी नेसून पोज देत आहे. तर विजय पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोस्टचे कॅप्शन सारखेच असून रश्मिकाच्या फोटोमध्ये विजयच्या घराचं बॉकग्राऊंड दिसत आहे.

रश्मिका आणि विजयने दिवाळीचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले- Happy Diwali my loves. यासोबतच दोघांनी हार्ट इमोजी आणि स्टार पोस्ट केले. यानंतर चाहत्यांना दोघांना चिडवण्याची सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले- 'मी रश्मिकाच्या पोस्टमध्ये हे कॅप्शन पाहिले आहे. दुसर्‍या एका चाहत्याने कमेंट केली, 'कोणाला वाटते की ते विजयच्या घरी आहेत.' याशिवाय एका व्यक्तीने लिहिले - 'मॅडम विजय सरांच्या घराची भिंत फोटोमध्ये दिसते.'


 

Web Title: Rashmika mandanna celebrate diwali with vijay deverakonda amid dating rumors same caption deep fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.