"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:50 IST2025-03-05T12:49:19+5:302025-03-05T12:50:22+5:30
सध्या सगळीकडेच रश्मिका मंदाना हे नाव दिसत आहे. जवळपास सर्वच हिट सिनेमांमध्ये ती आहे.

"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?
सध्या जवळपास प्रत्येक हिट सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य अभिनेत्री आहे. साऊथ असो किंवा हिंदी, रश्मिकाची लोकप्रियता वाढतच चालली आहे. सध्या गाजत असलेल्या 'छावा' मध्येही रश्मिका आहे तर त्याआधी आलेल्या 'पुष्पा २' मध्येही रश्मिका झळकली. याशिवाय तिच्या लव्हलाईफचीही चर्चा असते. ती हँडसम हंक साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. २०१८ साली आलेल्या त्यांच्या 'गीत गोविंदम' सिनेमात त्यांनी एक किसींग सीन दिला होता ज्याची अनेक महिने चर्चा झाली होती. रश्मिकाने त्या किसींग सीनवर भाष्य केलं होतं.
एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणालेली की, "ऑनस्क्रीन किस करणं जितकं माझ्यासाठी कठीण होतं तितकंच ते विजयसाठीही होतं. पहिल्यांदा किसींग सीन देणं जरा विचित्र होतं. माझ्यासाठी किस करणं खूप वैयक्तिक गोष्ट आहे. हे खूप इंटिमेट आहे. मला वाटलं की हे कसं होईल? २०० लोक सेटवर आहेत. किसींग सीन आहे, कसं करायचं, टेक्निकल कसं होणार, कसा अँगल असणार यावर आम्ही चर्चा करत होतो. तुम्ही कोणासोबत किसींग सीन करत आहात हेही तितकंच महत्वाचं असतं. जर ही भूमिकेची गरज असेल तर ठीक आहे नाहीतर किसींग सीन चित्रीत करण्याची गरज नाही."
रश्मिकाने विजयसोबत 'डिअर कॉम्रेड' या सिनेमातही काम केलं आहे. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरची चर्चा झाली. 'गीता गोविंदम' सिनेमानंतर रश्मिका नॅशनल क्रश बनली होती. यातली गाणी तर आजही ऐकली जातात. सध्या रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चाही सुरु आहेत. मात्र दोघंही करिअरमध्ये व्यस्त असल्याने आताच लग्न करणार नाही अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली.
रश्मिकाने आता आगामी 'थामा' सिनेमाच्या शूटला सुरुवात केली आहे. या सिनेमातून ती दिनेश विजानच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्स मध्ये एन्ट्री घेत आहे. यामध्ये तिच्यासोबत आयुष्मान खुराना आहे. शिवाय रश्मिका आगामी 'सिकंदर' सिनेमातही सलमान खानसोबत दिसणार आहे. २८ मार्चला सिनेमा रिलीज होणार आहे.