रश्मिका मंदानाला जोडीदार नेमका कसा हवा? असायला हवेत 'हे' गुण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:12 IST2025-01-02T17:11:36+5:302025-01-02T17:12:17+5:30
रश्मिका मंदानाने नुकतंच जोडीदाराबद्दल भाष्य केले.

रश्मिका मंदानाला जोडीदार नेमका कसा हवा? असायला हवेत 'हे' गुण!
Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 'पुष्पा' चित्रपटात श्रीवल्ली बनून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रश्मिका मंदानाने एकाच चित्रपटात सगळया हिरोईन्सना मागे सारले. या चित्रपटानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत अतिशय वाढ झालीच, पण असंख्य तरुणांची ती क्रश बनली. अद्याप अविवाहित असलेल्या रश्मिकासोबत विवाह करण्यासाठी अनेक तरुण उत्साहित आहेत. रश्मिका मंदानाने नुकतंच जोडीदाराबद्दल भाष्य केले. तिनं आपल्या जोडीदारबद्दलची अपेक्षा सांगितली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.
रश्मिकाने तिचा जोडीदार बनण्यासाठी आवश्यक असलेल्या अपेक्षा Cosmopolitan India शी बोलताना सांगितल्या आहेत. ती म्हणाली की, "नातेसंबंधातील माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट दयाळूपणा आणि आदर आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, खऱ्या अर्थाने काळजी घेता आणि एकमेकांसाठी जबाबदार असता तेव्हा हे सर्व गोष्टी आपोआप जुळतात. माझा पार्टनर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर माझ्यासोबत असायला हवा. प्रेम करणे, सहानुभूती दाखवणे, देखभाल करणे आणि प्रामाणिक असणे हे गुणही त्याच्या ठायी असायला हवेत", असे रश्मिका म्हणाली.
रिपोर्टनुसार, रश्मिका ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडा याला डेट करत आहे. दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नसली तरीही अनेकदा दोघे एकत्र दिसतात. कधी मालदीव्ह व्हॅकेशन तर कधी हॉटेलमध्ये डिनर करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांचं लग्न कधी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.