रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:30 IST2025-03-28T19:29:10+5:302025-03-28T19:30:08+5:30

रोमान्स आणि अनोखी कथा असणारे कोरियन चित्रपट हे जगभरातील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

Rashmika Mandanna Reveals Her Favourite K-dramas And C-dramas Check Out The List | रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

रश्मिका मंदाना आहे कोरिअन ड्रामाची चाहती, तिच्या आवडत्या सीरिजची यादी वाचाच

Rashmika Mandanna Favorite K-dramas And C-dramas: रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं दाक्षिणात्य आणि बॉलिवूड असं दोन्हीकडे आपला जम बसवला आहे. तिचा चाहतावर्ग जगभरात आहे. अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण, तुम्हाला माहितेय रश्मिका मंदाना हिला काय आवडतं. ती कोरिअन ड्रामाची मोठी चाहती आहे. रश्मिका कोरियन ड्रामा बघायला फार आवडतात. आता नुकतंच रश्मिकानं तिच्या आवडत्या सीरिजची यादीच दिली आहे. 

नुकतंच रश्मिका मंदानाने तिच्या इंस्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन घेतलं होतं. यावेळी तिनं चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्याने अभिनेत्रीला काही चांगले के-ड्रामा सुचवण्यास सांगितलं. तर उत्तरात रश्मिकाने लिहिले, "मी नुकतेच 'लव्ह स्काउट' (Love Scout) पाहिलं. तसेच 'द फर्स्ट फ्रॉस्ट' (The First Frost) हा चायनिज ड्रामा मला खूप आवडला. तर सध्या 'अंडरकव्हर हायस्कूल' (The Undercover High School) हा ड्रामा पाहतेय".

आणखी एका चाहत्यानं रश्मिकाला तिचा आवडता कोरयिन ड्रामा कोणता, असा प्रश्न केला. यावर तिनं सांगितलं, "मी जवळजवळ प्रत्येक मालिका पाहिली आहे त्यामुळे निवड करणे खरोखर कठीण आहे. पण जर मला खरोखर निवड करायची असेल, तर मी 'इट्स ओके टू नॉट बी ओके' (It's Okay to Not Be Okay) निवडेन".

'लव्ह स्काउट' ही सीरिज जानेवारीमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. तर 'द फर्स्ट फ्रॉस्ट' हीदेखील नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. यासोबतच रश्मिका सध्या पाहात असलेली 'अंडरकव्हर हायस्कूल' ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. तर ऱश्मिकाची सर्वांत जास्त आवडती सीरिज 'इट्स ओके टू नॉट बी ओके' ही नेटफ्लिक्सवर पाहता येईल. दरम्यान, रश्मिका लवकर सलमान खानसोबत 'सिंकदर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Rashmika Mandanna Reveals Her Favourite K-dramas And C-dramas Check Out The List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.