रश्मिका मंदानाला काय झालं? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:01 IST2025-01-12T10:00:56+5:302025-01-12T10:01:45+5:30

रश्मिकानं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna Suffers Leg Injury During Gym Workout Sikander Schedule Postponed | रश्मिका मंदानाला काय झालं? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

रश्मिका मंदानाला काय झालं? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Rashmika Mandanna Suffers Leg Injury : प्रेक्षकांची लाडकी 'श्रीवल्ली' अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. पण नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळं रश्मिकाचे चाहेत चिंतेत पडले आहेत.

रश्मिकानं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसतंय. रश्मिका मंदाना जिममध्ये जखमी झाली. फार गंभीर दुखापत नसून तिला केवळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ती लवकराच लकरच बरी होईल अशी माहिती आहे.

रश्मिकानं तब्येतीचे अपडेट्सही दिलं आहेत. तिनं लिहिलं की, बरं... मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!  जिममध्ये मला दुखापत झाली. बरं होण्यासाठी काही आठवडे, महिने किंवा आणखी किती दिवस लागतील हे देवालाच माहिती. थामा, सिकंदर आणि कुबेरच्या सेटवर लवकरच परत जाईन अशी आशा आहे. दिग्दर्शकांकडे मी माफी मागते...  माझे पाय अॅक्शनासाठी किंवा कमीत कमी उडी मारण्याइतके बरे झाले की सेटवर परतेल. पण, जर तुम्हाला माझी गरज पडली तर मी कोपऱ्यात एक अत्यंत प्रगत सशासारख्या उड्या मारेल", असं रश्मिकानं म्हटलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहे. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा चाहत्यांनी दिल्या आहेत. 


रश्मिका मंदान्ना शेवटची अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २' मध्ये दिसली होती. रश्मिका मंदान्नाचा 'सिकंदर' (Sikander) हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होत आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे आणि या सिनेमाचं एआर मुरुगदास दिग्दर्शित करत आहेत. यानंतर, ती आयुष्मान खुरानाच्या 'थामा' आणि  विकी कौशलसोबत 'छावा'मध्ये दिसणार आहे. तसेच 'कुबेरा' आणि 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे. चाहते या सर्व चित्रपटांबद्दल खूप उत्सुक आहेत.

Web Title: Rashmika Mandanna Suffers Leg Injury During Gym Workout Sikander Schedule Postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.