'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:59 PM2024-08-22T15:59:18+5:302024-08-22T15:59:54+5:30

'कांतारा'ला मिळालेल्या यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.

Rishab Shetty prepares for 'Kantara Chapter 1' shares a Kalaripayattu training picture | 'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत!

'कांतारा चॅप्टर-1' मध्ये सॉलिड ॲक्शन सीक्वेन्स, ऋषभ शेट्टी घेतोय विशेष मेहनत!

 एक झालं की एक धमाकेदार साऊथ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे सिनेमे अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावून सोडत असल्याचं पाहायला मिळतं. यापैकी एक सिनेमा म्हणजे 'कांतारा'. 'कांतारा' हा कन्नड चित्रपट चांगलाच गाजला होता. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमी बजेट असून देखील दमदार कहाणीमुळे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता.  'कांतारा'ला मिळालेल्या यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. नुकतंच चित्रपटाबद्दल अपडेट समोर आलं आहे. 

 'कांतारा' या सिनेमामुळं ऋषभ रातोरात स्टार झाला. ऋषभनं आता दूरदर्शी कथा सांगणारा, दिग्दर्शक आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळख मिळवली आहे. दरम्यान, आता कांतारा सिनेमाचा सिक्वेलदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा चॅप्टर-1'  असं या सिनेमाचं नाव आहे. 'कांतारा' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. चित्रपट हिट झाल्यावर ऋषभने त्याच्या आगामी भागाची घोषणा केली, जो खरंतर या चित्रपटाचा प्रिक्वेल आहे. आता ऋषभ प्रिक्वेलसाठी खास तयारी करत आहे. 


 ऋषभ हा केवळ भूमिकेसाठीच नव्हे तर एकंदरित स्वत:मध्ये शारिरीक बदल घडवून आणण्यासाठी तो मेहनत घेताना दिसतोय. त्याच्या कलारीपयट्टूच्या प्रशिक्षण सत्रातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ऋषभ कलारीपयट्टूचा अभ्यास करताना दिसत आहे. केसांचा जुडा घातलेला असून हातात तलवार, ढाल पकडलेली आहे. यावरून त्याची ‘कांतारा २’ साठी जोरदार तयारी सुरू आहे, हे लक्षात येते.

Web Title: Rishab Shetty prepares for 'Kantara Chapter 1' shares a Kalaripayattu training picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.