'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:51 IST2024-03-11T13:50:40+5:302024-03-11T13:51:10+5:30
Sai pallavi: साई पल्लवीचा हा नवा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, तिचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीत उतरला आहे.

'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क
नो मेकअप लूकला पसंती देणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे तिच्याविषयी कोणतीही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल होते. यात सध्या तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या गाजलेल्या गाण्यावर तिने डान्स केला आहे.
सोशल मीडियावर सध्या साई पल्लवीचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत येत आहे. तिचा हा व्हिडीओ एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा साई पल्लवीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साई पल्लवी एका सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. जपानमध्ये तिने ही पार्टी केली असून यात बॉलिवूड गाण्यावर ती थिरकली आहे.
दरम्यान, कंगना रणौतच्या लंडन ठुमका या लोकप्रिय गाण्यावर साई पल्लवीने डान्स केला आहे. यावेळी तिने ब्लू कलरचा स्वेटशर्ट परिधान केला होता. साई पल्लवीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात फिदा, दिल धडक धडक, मारी 2, NGK यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.