'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:35 IST2024-04-18T13:35:24+5:302024-04-18T13:35:45+5:30
Sai Pallavi : सोशल मीडियावर साई पल्लवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत साई पल्लवी २०१० साली रिलीज झालेला चित्रपट तीस मार खांमधील शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'(Ramayana)मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर साई पल्लवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत साई पल्लवी २०१० साली रिलीज झालेला चित्रपट तीस मार खांमधील शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
साई पल्लवी सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिने तिच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या कॉलेजच्या दिवसांतील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत साई फ्रेंड्ससोबत शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि ते त्यांचे कौतुक करताना थकत नाही आहेत.
#SaiPallavi in
— Prabu (@prabumuthiyalu) April 16, 2024
Sheela ki Jawani Song at her College Fest 🥵🥵🥵🥵🥵 pic.twitter.com/0bA6zIb0Rr
२००८ साली साई पल्लवीने उंगलिल यार अदुथा प्रभू देवा नामक डान्सिंग रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता आणि २००९ सालीदेखील धी ४मध्येही सहभागी झाली होती. साईला डान्सची आवड आहे.