Salaar First Song : प्रभासच्या 'सालार'मधील पहिलं गाणं 'सूरज की छांव बनके' झालं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:59 PM2023-12-14T12:59:15+5:302023-12-14T12:59:58+5:30

Salaar Movie : सालार पार्ट १: सीझफायरच्या निर्मात्यांनी नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटातील पहिले गाणे सूरज ही छाव बनके लाँच केले आहे.

Salaar First Song: The first song from Prabhas's Salaar 'Sooraj Ki Chhaon Banke' has been released | Salaar First Song : प्रभासच्या 'सालार'मधील पहिलं गाणं 'सूरज की छांव बनके' झालं रिलीज

Salaar First Song : प्रभासच्या 'सालार'मधील पहिलं गाणं 'सूरज की छांव बनके' झालं रिलीज

बाहुबली फेम अभिनेता प्रभास(Prabhas)चा सालार पार्ट १ : सीझफायर (Salaar Cease Fire) २०२३ वर्षातला बहुप्रतीक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाची चाहते आणि प्रेक्षकांमध्ये दमदार चर्चा आहे आणि हा अॅक्शन ड्रामा पाहण्यासाठी सगळे खूप उत्सुक आहे. या सगळ्यात निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी पहिले गाणं रिलीज केले आहे.

सालार पार्ट १: सीझफायरच्या निर्मात्यांनी नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटातील पहिले गाणे सूरज ही छाव बनके लाँच केले आहे. या गाण्यात भावनिक पैलू अनुभवायला मिळतात. हा चित्रपट केवळ अॅक्शन ड्रामा नसून दोन जिवलग मित्रांच्या भावनिक कथेवर आधारित असेल हेही या गाण्यातून दिसून येते.

'सालार'चे पहिले गाणे 'सूरज ही छाव बनके' हे गाणे मेनुका पोडले यांनी गायले आहे आणि त्याचे दिग्दर्शन रवी बसरूर यांनी केले आहे. गाण्याचे बोल रिया मुखर्जीने लिहिले आहेत. चित्रपटातील हे गाणे खूप पसंत केले जात असून या गाण्याच्या हिंदी व्हर्जनला यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ११ तासांत १४ लाख ४२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे निर्मात्यांनी नुकताच लिरिकल व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये फोटोंसह व्हिडीओ फॉरमॅटमध्ये गाण्याचे बोल जारी करण्यात आले आहेत. असे असूनही हे गाणे लोकांच्या मनाला भिडणारे आहे.

'सालार'ला मिळालं 'ए' सर्टिफिकेट
सालारला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळाले आहे. याचा अर्थ केवळ १८ वर्षांवरील लोकांनाच चित्रपटगृहात चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा रनटाइम २ तास ५५ मिनिटं आहे. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर शाहरुख खानच्या 'डंकी'सोबत होणार आहे. 'डंकी' २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी होते हे पाहणे बाकी आहे.

Web Title: Salaar First Song: The first song from Prabhas's Salaar 'Sooraj Ki Chhaon Banke' has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास