'KGF चॅप्टर 2' नंतर 'सालार'चा विक्रम, मुंबईत लागला 120 फूट लांबीचा कटआउट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:46 PM2023-12-18T15:46:15+5:302023-12-18T15:50:21+5:30

सध्या प्रभास 'सालार' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Salaar Part 1: CeaseFire Star Prabhas' 120 feet Cut Out Installed In Mumbai | 'KGF चॅप्टर 2' नंतर 'सालार'चा विक्रम, मुंबईत लागला 120 फूट लांबीचा कटआउट

'KGF चॅप्टर 2' नंतर 'सालार'चा विक्रम, मुंबईत लागला 120 फूट लांबीचा कटआउट

साउथ स्टार प्रभासची मोठी क्रेझ आहे. बॉलिवूडमध्येहीप्रभास अतिशय लोकप्रिय आहे. जेव्हाही प्रभासचा चित्रपट प्रदर्शित होतो, त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सवासारखे वातावरण असते.  ठिकठिकाणी प्रभासचे होर्डिंग्ज चाहते लावतात. सध्या प्रभास 'सालार' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला तो येणार आहे. सालारच्या प्रदर्शनापुर्वीही प्रभासचा मोठा कटआउट मुंबईत लागला आहे.

'सालार' २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईतील हार्टलँडमध्ये चित्रपटाचा 120 फूट लांबीचा कटआउट लावण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात मोठा कटआउट बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'सालार' च्या आधी होंबळे फिल्म्सने 'KGF Chapter 2' चा 100 फूट कटआउट लावला होता.

'सालार'मध्ये प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू या कलाकारांचा समावेश आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

सालार'मध्ये प्रभासचा डॅशिंग अवतार पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रभाससाठी  एक मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. कारण याआधी आलेले त्यांचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत हा चित्रपट शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाला टक्कर देणार आहे. 'बाहुबली'मधून चमकलेला प्रभास पुन्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  
 

Web Title: Salaar Part 1: CeaseFire Star Prabhas' 120 feet Cut Out Installed In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.